शनिवारवाड्यात बॉम्बची अफवा पसरवणाऱ्या बीडमधील तरुणाविरुद्ध गुन्हा, पोलिसांना दिली खोटी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 09:13 IST2024-06-03T09:12:39+5:302024-06-03T09:13:29+5:30
पुणे : पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शनिवारवाड्यात बाॅम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या बीडमधील तरुणाविरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रामहरी ...

शनिवारवाड्यात बॉम्बची अफवा पसरवणाऱ्या बीडमधील तरुणाविरुद्ध गुन्हा, पोलिसांना दिली खोटी माहिती
पुणे : पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शनिवारवाड्यात बाॅम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या बीडमधील तरुणाविरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रामहरी अश्रू सातपुते (रा. चिंचपूर, ता. आष्टी, जि. बीड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई राकेश गायकवाड यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सातपुतेने शनिवारी (१ जून) पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी केला. शनिवारवाड्यातील प्रवेशद्वारात बाॅम्ब ठेवला असल्याची खोटी माहिती त्याने नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
बाॅम्बशोधक-नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बाॅम्बशोधक पथकाने पाहणी केली. तेव्हा बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली. पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास केला. तपासात सातपुते याने दूरध्वनी करून खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत.