पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर पलटी; चाकण-शिक्रापूर महामार्गावरील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 13:19 IST2018-01-19T13:18:28+5:302018-01-19T13:19:53+5:30
चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भिमाभामा नदीलगतच्या धोकादायक वळणावर पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर वाहतुकीदरम्यान पलटी झाला.

पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर पलटी; चाकण-शिक्रापूर महामार्गावरील प्रकार
शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भिमाभामा नदीलगतच्या धोकादायक वळणावर पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर वाहतुकीदरम्यान पलटी झाला. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आज (दि. १९) पहाटे साडेपाच सुमारास झाला.
अपघातग्रस्त टँकर चाकणहून शिक्रापूर बाजूकडे जात होता. मात्र येथील भिमाभामा नदीलगत असणा?्या धोकादायक वळणावर वळण घेताना रस्त्यालगत तो पलटी झाला. त्यामुळे टँकरमधील पेंटसदृश लिक्विड रस्त्यावर सांडले.
दरम्यान राज्य महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या उद्भवली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले.