सातारा :फलटणच्या पृथ्वी चौकात ट्रक खाली सापडल्याने वृध्द ठार, वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक चौकात अपघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:43 AM2018-01-12T10:43:49+5:302018-01-12T10:49:37+5:30

फलटण (सातारा) येथील वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनत चाललेल्या गजबजलेल्या पृथ्वी चौकात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ट्रकखाली सापडून वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला. साहेबराव राऊत (वय, ६३ रा. लक्ष्मीनगर, फलटण) असे ट्रकखाली सापडून झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे.

Satara: Old to old people killed when they were found in a truck at Earth Chowk in Phaltan; | सातारा :फलटणच्या पृथ्वी चौकात ट्रक खाली सापडल्याने वृध्द ठार, वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक चौकात अपघात 

सातारा :फलटणच्या पृथ्वी चौकात ट्रक खाली सापडल्याने वृध्द ठार, वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक चौकात अपघात 

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक चौकात अपघात फलटणच्या पृथ्वी चौकात ट्रक खाली सापडल्याने वृध्द ठार

फलटण (सातारा) : येथील वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनत चाललेल्या गजबजलेल्या पृथ्वी चौकात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ट्रकखाली सापडून वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला. साहेबराव राऊत (वय, ६३ रा. लक्ष्मीनगर, फलटण) असे ट्रकखाली सापडून झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (एमएच ४५ - ००७८) पृथ्वी चौकातून क्रांतिसिंह नाना पाटील चौकाकडे निघाला होता.

यावेळी  मोटारसायकलवरून जात असलेले साहेबराव राऊत हे ट्रकखाली सापडले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. घटनास्थळी बघ्यांची खुप मोठी गर्दी झाली होती पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Satara: Old to old people killed when they were found in a truck at Earth Chowk in Phaltan;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.