पुणे होतेय कलाकारांचे करिअर डेस्टिनेशन

By admin | Published: May 20, 2015 01:11 AM2015-05-20T01:11:40+5:302015-05-20T01:11:40+5:30

मुंबईतील चित्रपटांची ग्लॅमरस दुनिया प्रत्येक कलाकाराला भुरळ पाडते. अभिनयात करिअर करायचे म्हटले की नजरेसमोर दिसायची ती फक्त मायानगरी मुंबईच.

Career Destination of Artists from Pune | पुणे होतेय कलाकारांचे करिअर डेस्टिनेशन

पुणे होतेय कलाकारांचे करिअर डेस्टिनेशन

Next

प्रियांका लोंढे ल्ल पुणे
मुंबईतील चित्रपटांची ग्लॅमरस दुनिया प्रत्येक कलाकाराला भुरळ पाडते. अभिनयात करिअर करायचे म्हटले की नजरेसमोर दिसायची ती फक्त मायानगरी मुंबईच. पण आता हे समीकरण काळाच्या ओघात बदलत आहे. पुण्यात आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा... प्रायोगिक रंगभूमी... लोणावळा, वाई, महाबळेश्वर अशी चित्रीकरणासाठीची ठिकाणे... वाढते स्टुडिओ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कलाकारांना परवडतील अशा दरात भाड्याने फ्लॅट्स मिळणे या गोष्टींमुळे पुणे हे आजच्या नवोदित कलाकारांचे करिअर डेस्टिनेशन झाले आहे.
आता वाढत्या महागाईमुळे कलाकारांना एकाच फ्लॅटमध्ये ग्रुपने राहावे लागत आहे. काम मिळवता मिळवता घरभाडे देणे हा मोठा प्रश्न कलाकारांसमोर ठाण मांडून बसल्याने कलाकारांनी आपला मोर्चा कला व संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याकडे वळवला आहे. पुण्याहून रेल्वे आणि रस्त्याने केवळ अडीच-तीन तासांच्या अंतरावर मुंबई असल्याने पुण्यात राहून काम मिळविण्याचा प्रयत्नही अनेक जण करतात. प्रामुख्याने बॅक स्टेज आर्टिस्ट तर मुंबईपेक्षा आता पुण्याला प्राधान्य देऊ लागले आहे.

स्पर्धांमधून मिळणाऱ्या संधी
पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा होतात. यामध्ये फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यांना इथूनच करिअरची संधी मिळते. फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक या स्पर्धांमधून कितीतरी कलाकार आज चित्रपटसृष्टीला मिळाले आहेत. पुण्यात प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्याची संधी कलाकारांना मिळते. तर मुंबईमध्ये प्रथम स्थानिक कलाकारांचाच विचार केला जातो.

चित्रीकरण स्थळे
वाई, महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा यांसारखी थंड हवेची ठिकाणे पुण्याच्या आसपास असल्याने चित्रीकरणासाठी जास्त पैसे खर्च न करता चांगली लोकेशन्स मिळत आहेत. गेल्या ३ ते ४ वर्षांत पुण्यात चित्रीकरणासाठी स्टुडिओदेखील वाढले आहेत. शिवाय इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून कलाकारांना संधी मिळतील असे बिग बजेट कार्यक्रमसुद्धा पुण्यात होत असतात.

चित्रीकरण स्टुडिओ
सिंहगड पायथ्याशी दादा कोंडके यांचा डी.के. स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये मोठे सेट्स लावून चित्रीकरणे होत असतात. बऱ्याच सिनेमांची चित्रीकरणे येथे झाली आहेत. तसेच नरेंद्र भिडे यांचा एक स्टुडिओ डी. पी. रोडला आहे. तिथेसुद्धा आता सिनेमांची मोठ्या प्रमाणावर शुटिंग होतात. पुण्यातील वाढत्या स्टुडिओजचा फायदा निर्माता, दिग्दर्शकांना होत आहे.

चित्रीकरण स्टुडिओ
सिंहगड पायथ्याशी दादा कोंडके यांचा डी.के. स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये मोठे सेट्स लावून चित्रीकरणे होत असतात. बऱ्याच सिनेमांची चित्रीकरणे येथे झाली आहेत. तसेच नरेंद्र भिडे यांचा एक स्टुडिओ डी. पी. रोडला आहे. तिथेसुद्धा आता सिनेमांची मोठ्या प्रमाणावर शुटिंग होतात. पुण्यातील वाढत्या स्टुडिओजचा फायदा निर्माता, दिग्दर्शकांना होत आहे.

प्रायोगिक नाटकांचा रंगमंच
भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर यासारख्या थिएटर्स मध्ये प्रायोगिक नाटकांचे प्रयोग वर्षानुवर्षे होत आहेत. अनेक दर्जेदार नाटकांच्या हाऊसफुल्लच्या पाट्या या थिएटर्सच्या बाहेर झळकल्या
आहेत. कलाकारांना या रंगमंचामुळे एक प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

मी माझ्या करिअरची सुरुवात पुण्यातूनच केली. सुदर्शन रंगमंचचे ग्रिट्स थिएटर, अनेक एकांंकिका स्पर्धा मी पुण्यात केल्या. नवीन टॅलेंट पुण्यातून येत आहे याचा आनंद तर होतोच पण त्यापेक्षा जास्त अभिमान वाटतो. फिरोदिया आणि पुरुषोत्तमसारख्या स्पर्धांकडे बॉलिवूडचेही लक्ष असते आणि त्याच संधींचा नव्या कलाकारांना फायदा होतो.
- सिद्धार्थ चांदेकर, अभिनेता

पुण्यातील ललित कला केंद्रामध्ये मी अभिनयाचे धडे घेण्यासाठी प्रवेश घेतला. अभिनयाबरोबरच मी इथे नृत्याचे प्रशिक्षणदेखील घेतले. पुण्यातून करिअरची सुरुवात झाली नसली तरी अभिनयाचे शिक्षण मात्र पुण्यातूनच मिळाले.
- प्राजक्ता माळी, अभिनेत्री

न परवडणारी घरे
मुंबईमध्ये राहण्यासाठी घर मिळणे आज अवघड होऊन बसले आहे. भाड्याने घर घेणेही परवडत नाही. त्यामुळे भाड्याने रूम घेऊन ८ ते १० कलाकार एकत्र राहतात. काही जण तर पुणे ते मुंबई असा प्रवास कामासाठी करतात. पूर्वी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये कलाकारांची राहण्याची व्यवस्था केली जात असे. पण ते पाडल्यानंतर आता त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सुनील महाजन, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

Web Title: Career Destination of Artists from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.