मोटारीने घेतला अचानक पेट; धायरी पुलावरील प्रकार, वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:29 IST2017-10-31T14:21:23+5:302017-11-01T11:29:11+5:30

धायरी येथील पुलावर मंगळवारी सकाळी एका मोटारीला अचानक आग लावून त्यात संपूर्ण मोटार जळून खाक झाली़. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही़.

The car suddenly fire; traffic on Dhayri bridge, traffic lock | मोटारीने घेतला अचानक पेट; धायरी पुलावरील प्रकार, वाहतुकीचा खोळंबा

मोटारीने घेतला अचानक पेट; धायरी पुलावरील प्रकार, वाहतुकीचा खोळंबा

ठळक मुद्देगाडी नेमकी पुलावर असल्याने जवळपास पाणी नसल्याने ती विझविण्याचे प्रयत्न करता आले नाही़त. या आगीत संपूर्ण मोटार जळून खाक झाली़ 

पुणे : सिंहगड रोडवरील धायरी येथील पुलावर मंगळवारी सकाळी एका मोटारीला अचानक आग लावून त्यात संपूर्ण मोटार जळून खाक झाली़ सुदैवाने चालकाने आग लागलेली पाहताच बाहेर उडी मारल्याने कोणालाही दुखापत झाली नाही़ 
याबाबत अग्निशामक दलाने सांगितले, की दिनेश सुतार (रा़ वारजे) हे आपली मोटार घेऊन बंगळुरू-मुंबई महामार्गावरुन वारजेकडे जात होते़ धायरी येथील उड्डाणपुलावर ते आले असताना सकाळी १० वाजता अचानक मोटारीने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी तातडीने मोटारीतून बाहेर उडी मारली़ काही क्षणात संपूर्ण मोटार पेटली़. गाडी नेमकी पुलावर असल्याने जवळपास पाणी नसल्याने ती विझविण्याचे प्रयत्न करता आलेत. नाही़ मोटार पेटल्याने दोन्ही बाजूची वाहतूक थांबून राहिली होती़ 
सिंहगड रोड अग्निशामक केंद्राची गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली़ परंतु, पुलावर वाहनांची रांग लागली असल्याने त्यांना विरुद्ध दिशेने जावे लागले़ काही वेळातच मोटारीची आग विझविण्यात आली़ या आगीत संपूर्ण मोटार जळून खाक झाली़ 

Web Title: The car suddenly fire; traffic on Dhayri bridge, traffic lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.