शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कारची स्टंटबाजी पडली महागात! बारामतीत दोघांना पोलिसांनी शिकवला धडा, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:41 IST

काही स्टंट बाज, टुकार वाहनचालक नियमांची पायमल्ली करणारे आढळून आल्यास नागरिकांनी न घाबरता वाहतुक पोलिसांना कळवावे

बारामती: बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात बेफाम चालवलेल्या दोन 'स्टंट कारच्या' व्हायरल व्हिडीओने बारामतीकरांचा अक्षरशः थरकाप उडाला. हे व्हिडीओ थेट वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यापर्यंत पोहोचले, मग काय? या वाहनांचा वाहतूक पोलिसांचे मर्फतीने शोध घेत अखेर या स्टंटबाजांना बारामती पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यादव यांनी चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांची माहिती कळवावी असे आवाहन व्हाट्सअप मेसेज द्वारे केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. बारामती एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक ते गदीमा चौक या रहदारीच्या रस्त्यावर दोन चारचाकी वाहणांनी स्टंटबाजी करून स्वतःच्या अणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक टाटा पंच तर दुसरी पोलो गाडी असल्याचे दिसत होते. हा स्टंट जर चालकाच्या अंगलट आला असता तर यात अनेकांना जीवही गमवावा लागला असता. वाहतूकीच्या दृष्टीने बारामती शहर सुरक्षित करण्यासाठी वाहतुक पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक उपक्रम राबवून, दंड आकारून, दोरीचे प्रयोग करून, प्रसंगी वाहन चालक आणि नागरीकांचे प्रबोधन करून उत्तम आणि प्रामाणिक काम केले आहे. मात्र या व्हिडीओने बारामतीकरांना धक्काच बसला. व्हायरल व्हिडीओत वाहनांचे नंबर अस्पष्ट दिसत असल्याने वाहतूक शाखेसाठी हे मोठे आव्हान होते. मात्र वाहतूक शाखेने या वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत अखेर त्या वाहनांचा शोध घेतला. त्यातील एक चारचाकी दौंड तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा दि. २५ जानेवारी रोजी घडला असल्याचे सिद्ध झाले. 

 तर दि. २७ रोजी टाटा पंच (एम.एच ४२ बी.ई ७२४७) तसेच वोक्सवॅगन कंपनीच्या पोलो गाडीच्या वाहनचालकांवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर आव्हाड( रा. पाटस, ता. दौंड) आणि तेजस मनोज कांबळे (वय २२, रा. -रुई, बारामती) या स्टंटबाजी करणाऱ्यांचे विरोधात बेदरकारपणे वाहन चालविणे चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे,सुधाकर जाधव,अजिंक्य कदम,योगेश कातवारे तालुका पोलीस स्टेशन चे रावसाहेब गायकवाड,ओंकार सिताप आदींनी केली.

बारामतीला वाहतुक कोंडीपासून सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतुक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाही काही स्टंट बाज, टुकार वाहनचालक नियमांची पायमल्ली करून शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करतात. मात्र असे प्रसंग आढळून आल्यास नागरिकांनी न घाबरता वाहतुक पोलिसांना कळवावे. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येइल.- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसcarकारMONEYपैसा