शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑन ड्युटी’ पोलिसांच्या अंगावर घातली कार; अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:28 IST

पोलिसांनी गाडीची पाहणी केली. त्यावेळी ही गाडी लॉक करण्यात आल्याचे त्यांना दिसून आले.

बारामती : ‘ऑन ड्युटी’ असणाऱ्या पोलिसांच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (२९ मे) रोजी बारामतीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, संबंधित कारचालकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार संतोष दत्तू कांबळे (रा. शिर्सूफळ, ता. बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कांबळे बारामती तालुका पोलिस ठाण्यात चालक पदावर कार्यरत आहेत. ही घटना दि. २९ मे रोजी घडली आहे. कांबळे हे त्या दिवशी ऑन ड्युटी होते. यावेळी बारामती तालुका पोलिस ठाण्याजवळ एका बेकरीसमोर काळ्या रंगाची क्रमांक नसलेली कार चालक रहदारीच्या रस्त्यावर स्टंट करत असल्याची, तसेच कार वेडीवाकडी चालवून धोका निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कांबळे हे शासकीय वाहन (एमएच ४२, बीबी ७७४९) घेऊन घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी गाडीची पाहणी केली. त्यावेळी ही गाडी लॉक करण्यात आल्याचे त्यांना दिसून आले. पोलिस परिसरात चौकशी करत असताना, एक २४ वर्षे वयाचा तरुण त्यांच्याजवळ आला. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता, त्याने नाव सांगण्यास नकार दिला. तू मोटारीतून स्टंटबाजी का करतो, अशी त्यांनी विचारणा केली. त्यावर त्याने पोलिसांना अरेरावी केली. पोलिसांनी त्याला तू वाहन बाजूला घे, अथवा पोलिस ठाण्यात चल असे सांगितले. यावेळी त्या तरुणाने पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करून गाडी क्रेनवरून कुठेही न्यायची नाही, असे म्हणत आरडाओरडा सुरू केला. माझ्या नादाला लागला, तर एकेकाला गाडीखाली घेऊन जीव घालवेन, अशी धमकी दिली.

त्याने गाडीमध्ये बसून सुरुवातीला गाडी मागे घेत फिर्यादीला जोराची धडक दिली. त्यात फिर्यादी हे डोक्यावर पडल्याने जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेल्या अंमलदारांनी चालकास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने समोरील बाजूने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न करत तो जोरात तेथून निघून गेला. दरम्यान कांबळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी