ओतूर : जुन्नर तालुक्यात कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर उदापूर हद्दीत सोमवारी (दि. ६) रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास कार- मोटारसायकलची धडक होऊन यात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर प्रेम भरत घोडेकर हा कल्याणच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असताना व चारचाकीचालक आळे फाट्याच्या दिशेने येत होती. उदापूर हद्दीत एका हॉटेलसमोर दोघेही एकमेकांना धडकून हा अपघात झाला. त्यात प्रेम भरत घोडेकर (वय २५, रा. शतलक्ष्मी कॉम्प्लेक्स ओतूर, ता. जुन्नर) गंभीर जखमी झाला होता. यावेळी तत्परतेने वाटसरू व स्थानिकांच्या मदतीने ओतूर प्राथमिक केंद्रात प्राथमिक तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघाताचा तपास ओतूर पोलिस करीत आहेत. कल्याण-अहिल्यानगर या महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ता दुभाजकाची गरज असल्याचे स्थानिक नागरिक मागणी करत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.