शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यातील वैदवाडी चौकात कारची दुचाकीला धडक; एकाचा पाय फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 12:32 IST

वैदवाडी चौकात चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आल्याने जाणाऱ्या वाहनांची गती वाढली आहे

अवसरी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव कारखाना लोणी रस्त्यावर वैदवाडी चौकात अपघाताची मालिका कायमच सुरू आहे. चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची गती वाढली आहे. परिणामी रस्त्यालगतच्या दुकानदारांसह पादचाऱ्यांनी अपघाताची भीती व्यक्त केली.

शुक्रवार (दि.०४) रोजी दुपारी बारा एक वाजण्याच्या सुमारास शिरूर वरून वैदवाडी फाटा मार्गे मंचर वरून भीमाशंकरला जाणाऱ्या कार चालकाने पारगाव वैदवाडी फाटा मार्गे लोणीला जाणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकी वरील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला. तर दुसरा किरकोळ जखमी झाला.त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले.

पारगाव कारखाना लोणी रस्त्यावर वैदवाडी चौकात कायमच अपघात घडताना दिसून येत आहे. सदर चौक व परिसर नेहमीच वर्दळीचा असतो. या चौकात मंचर शिरूर व पारगाव कारखाना लोणी  या चारही गावाकडून येणारे रस्ते जोडले जातात. त्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते. त्यात आता चारही बाजून येणाऱ्या रस्त्यांची कामे झाली आहेत तर काही अंतिम टप्प्यात आहेत. रस्ते चांगले झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. काही क्षणातच हा चौक वाहनचालक पार करताना दिसतात. डांबरीकरण नुकतेच झाले आहे यादरम्यान काही दुचाकीस्वारांचे किरकोळ स्वरुपाचे अपघात झाले आहेत. यापूर्वीही या रस्त्यावरून अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून काही नागरिकांना प्राणही गमावले लागले आहे. या चारही बाजूंनी रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या वृद्धांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.  त्यामुळे सार्वजानक बाधकाम विभागाने नागरिकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर गतिरोधक बसवणे गरजेचे आहे. वैदवाडी चौकात आबालवृद्धांची रस्ता ओलांडताना तारांबळ उडते. दुसरा कोणताही अनुचित प्रकार घडण्याची वाट न पाहता, या चौकात महत्त्वाच्या ठिकाणी प्रशासनाने गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावAccidentअपघातcarकारbikeबाईकhospitalहॉस्पिटलhighwayमहामार्ग