Pune Crime: कार रिपेअरसाठी दिली, एजंटाने परस्पर विकली! पुण्यातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: August 14, 2023 19:00 IST2023-08-14T18:59:40+5:302023-08-14T19:00:38+5:30
एजंटने कार रिपेअर करण्यासाठी घेऊन जातो, असे सांगून एकाची...

Pune Crime: कार रिपेअरसाठी दिली, एजंटाने परस्पर विकली! पुण्यातील घटना
पुणे : जुन्या कार खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटने कार रिपेअर करण्यासाठी घेऊन जातो, असे सांगून एकाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अभिषेक रवींद्र येनपुरे (३१, रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली.
अधिक माहितीनुसार, आरोपी भूषण काळे (३२, रा. कात्रज) याचा जुन्या कार खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदार येनपुरे यांना त्यांच्याकडची मारुती इको कार पसंत पडली. ती खरेदी करण्यासाठी मूळ मालकाला टोकन म्हणून काही रक्कम द्यावी लागेल, असे आरोपीने सांगितले.
त्याप्रमाणे येनपुरे यांनी एक लाख ५० हजार रुपये आरोपीला दिले. त्यानंतर सदरची कार ही रिपेअर करण्यासाठी घेऊन जातो, असे सांगून ती परस्पर विकून टाकली. येनपुरे यांनी काही दिवसांनी कारबाबत विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आणि ती कार आरोपीने परस्पर विक्री केल्याचे समजले. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी भूषण काळे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.