शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच; तळजाई परिसरात पंधरा ते वीस गाड्या फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:17 IST

गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्र मागील काही दिवसांपासून शहरात सुरू

धनकवडी (पुणे) : शहरासह उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाली असून वनविश वस्ती, तळजाई पठार परिसरातील रस्ता लगत पार्किंग केलेल्या पंधरा ते वीस गाड्यांची अज्ञात्यांनी तोडफोड केली, तोंडावर रुमाल बांधून आलेल्या टोळक्याने धुडगूस घालत ह्या गाड्या फोडल्या आहेत. दहशतीच्या नावाखाली सर्वसामान्य पुणेकरांच्या गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्र मागील काही दिवसांपासून शहरात तर सहकारनगर, पद्मावती, आंबेगाव पठार परिसरात पाहायला मिळत आहे.

सोमवारी वारजे परिसरात सात गाड्यांची तोडफोड झालेली होती. तसेच सोमवार आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस तळजाई परिसरात दहशतीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

बांधकाम मजूर, पेंटर, पथारी व्यावसायिक, कचरावेचक, रिक्षाचालक, टेंपोचालक अशा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह या वाहनांवरच चालतो. मात्र, त्याच वाहनाची तोडफोड झाल्यामुळे आता ते नुकसान कोठून व कसे भरून काढायचे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

माझी चुलच बंद झाली-

पवन सुरेश मोरे (वय ३१ वर्षे, राहणार तळजाई माता वसाहत, पद्मावती घरी पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा) यांनी खाजगी ठिकाणी काम केले मात्र घर व्यवस्थित भागत नाही म्हणून तीनच महिने झाले भाडे तत्वावर रिक्षा चालवत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सात आठ जणांच्या टोळक्याने धुडगुस घालत वाहनांची तोडफोड केली, माझ्या रिक्षाचे यात नुकसान झाले आहे. अगोदर मिळत असलेल्या पैशातून शिपचे पैसे देऊन राहणाऱ्या पैशात कसाबसा घरखर्च चालत आहे. त्यात हे नुकसान आता घर असं चालणार, उसनवारी करून रिक्षाचे काम करावे लागेल तेव्हा कुठे चुल पेटणार, अशी प्रतिक्रिया मोरे यांनी दिली.

टॅग्स :Taljai Tekdiतळजाई टेकडीPuneपुणे