कॅन्टोन्मेंटचे पाणी व्यवस्थापन गंभीर स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:57+5:302021-02-26T04:11:57+5:30

बच्चू, अड्डा, गवळीवाडा, भीमपुरा भागांतील काही बोळ, मोदीखाना, साचापीर स्ट्रीट, ताबूत स्ट्रीट, घोरपडी येथील फिलिप चाळीतील भागात जमिनीच्या चढउतार ...

Cantonment water management in critical condition | कॅन्टोन्मेंटचे पाणी व्यवस्थापन गंभीर स्थितीत

कॅन्टोन्मेंटचे पाणी व्यवस्थापन गंभीर स्थितीत

Next

बच्चू, अड्डा, गवळीवाडा, भीमपुरा भागांतील काही बोळ, मोदीखाना, साचापीर स्ट्रीट, ताबूत स्ट्रीट, घोरपडी येथील फिलिप चाळीतील भागात जमिनीच्या चढउतार यांची भौगोलिक परिस्थिती, जीर्ण व बाद झालेल्या जलनलिका, अवैध नळजोड, हॉटेल्ससाठी चोरलले पाणी यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सतत सामोरे जावे लागत आहे.

चौकट

कॅम्प भागाला दररोज १५ ते १६ एमएलडी इतके पुरेसा पाणीपुरवठा करते जे सभोवतालच्या मनपा भागापेक्षा खरंच जास्त आहे. लगतच्या हरकानागर, कासेवाडी, भवानी पेठ भागाला जरी स्वारगेट विभागातर्फे पाणीपुरवठा होत असला तरी तो कॅम्प भागापेक्षा कमीच आहे.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाची स्वतःची पाणीपुरवठा व्यवस्था नसल्याने ते पुणे मनपाकडून भाडेतत्त्वावर पाणी घेतात. १९९८ पासून ते आजपर्यंत बोर्ड महापालिकेला ४१ कोटी ५५ लाख रुपये थकबाकी देणे आहे.

याविषयी लष्कर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रंगनाथ तासकर सांगतात, की कॅम्प भागाला अतिशय नियमित व्यवस्थित पाणीपुरवठा असून येथील नलिका या ४० ते ५० वर्षे जुन्या, ब्रिटिशकाळातील भद्रावती कास्टिंग नलिका असून त्यात (शेल्डींग गाळ साचणे व क्लोरिफिकेशनमुळे गंजने)अतिशय जीर्ण व सडल्यामुळे त्यातून येणाऱ्या पाण्याला दाबच नाही. यातून येणारे ३०% पाणी हे गळतीमुळे जमिनीच्या आताच मुरते म्हणून त्वरित बदलणे गरजेचे आहे. नाही तर भविष्यात कॅन्टोन्मेंटची पाणीपुरवठा व्यवस्था नक्कीच उद्ध्वस्त होईल. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी त्वरित या जुन्या पाण्याच्या मुख्य नलिका बदलून त्या एमआई (माईल्ड स्टील),डीआय (डाक्टइल आयर्न) च्या टाकणे गरजेचे आहे.

Web Title: Cantonment water management in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.