शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 19:03 IST

वारकरी महिलेने ''काय झाले एवढे ? असे विचारले तरीसुद्धा बाळासाहेब चोपदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला.

आळंदी : वारकरी हाच केंद्रबिंदू म्हणून माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने पायी चालली आहे. मात्र यंदाची आषाढी पायीवारी कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. माऊलींची पालखी पुणे मुक्कामी असताना प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी वारकरी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावर विश्वस्तांकडून दिलगिरी व स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र हा प्रकार होऊन दहा दिवस होत नाही. तोच माऊली सोहळ्यातील चोपदाराने रागाच्या भरात एका वारकरी महिलेला जोरात ढकलून दिले. अक्षरशः ही महिला वारकरी डोक्यावर असलेली तुळस घेऊन जमिनीवर खाली पडली. या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून अनेक वारकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.         माऊलींचा पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर आहे. गुरुवारी (दि. ३) ठाकूर बुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरा गोल रिंगण सोहळा पार पडला. त्या दरम्यान एक महिला वारकरी डोक्यावर तुळस घेऊन त्या रिंगणातून चालली होती. मात्र रिंगणातून ती बाहेर होत असताना माऊली सोहळ्यातील चोपदाराने रागात ''सांगितलेले ऐकायला येत नाही का''? असे म्हणत त्या महिलेकडे धावत येऊन पाठीमागून जोराने ढकलून दिले. त्यावर त्या वारकरी महिलेने ''काय झाले एवढे ? असे विचारले तरीसुद्धा बाळासाहेब चोपदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला. विशेषतः हा सर्व प्रकार सुरू असताना देवस्थानचे ट्रस्टींनी बघ्याची भूमिका घेतली. 

          अखेर देवस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी चोपदारांना आवर घालत तिथून बाजू केले. या प्रकरणावर अजून विश्वस्तांन प्रतिक्रिया दिली नाही. तसेच चोपदार यांनी सुद्धा त्याबाबत खुलासा केला नाही. दरम्यान तीन - चार वर्षांपूर्वी दोन चोपदार वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यावेळी देवस्थानने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर पुढील काळात ते पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र या घडलेल्या संतापजनक घटनेनंतर संबंधित बाळासाहेब चोपदारांवर देवस्थान काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरेल. वारीतील चोपदारांची संख्या जिल्हा सत्र न्यायाधीशांनी ठरवल्याप्रमाणे असावी. वारीत २ चोपदार असावे. तसेच दोघांनाच देवस्थाने तशी सेवा द्यावी अशी मागणी अनिकेत कुऱ्हाडे यांनी देवस्थानकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpurपंढरपूरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीWomenमहिला