शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

... ठेकेदारांची कामे रद्द करणार : महापालिका प्रशासनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 07:00 IST

शहरामध्ये पूरानंतर मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, यासाठी महापालिकेला हजारो कामगारांची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पूरजन्य परिस्थिती

पुणे : शहरामध्ये पूरानंतर मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, यासाठी महापालिकेला हजारो कामगारांची आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने महापालिकेच्या विविध खाजगी ठेकेदारांना क्षेत्रीय कार्यालयनिहय मनुष्यबळ पुरविण्याचे आवाहन केले होते. परंतु, याकडे बहुतेक ठेकेदारांने दुर्लक्ष केले. यामुळे सोमवारी महापालिका प्रशासनाने मंगळवार (दि.१) रोजी सकाळपर्यंत अपेक्षित मनुष्यबळ न पुरविल्यास ठेकेदारांची कामे रद्द करण्यात येतील, असा इशाराच दिला आहे.     शहरामध्ये बुधवारी (दि.२५) रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. या पूरानंतर फार मोठ्या परिसराची स्वच्छता, चिखल साफ करणे, राडारोडा उचलणे, पूराच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा, मृत जनावरे, घरांतील साहित्य, गाड्या विल्हेवाट लावण्याचे मोठे आवाहन प्रशासनाच्या समोर आहे. यासाठी महापालिकेला हजारो कामगाराची आवश्यकता असून, महापालिकाचे कर्मचारी, स्वच्छ संस्थेसोबत महापालिकेचे खाजगी ठेकेदार, पुणे मेट्रो, पीएमआरडीए, क्रिडाई आदी विविध संस्थांकडून अधिकचे मनुष्यबळ पुरविण्याची विनंती करण्यात आली होती. याबाबत महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या भागातील ठेकेदारांना मनुष्यबळ पुरविण्यासाठी विशिष्ट टार्गेट दिले होते. परंतु दोन दिवसांनंतर देखील महापालिकेच्या आदेशाकडे बहुतेक ठेकेदारांनी दुर्लक्ष केले आहे.     महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संपूर्ण पूरग्रस्त भागाच्या स्वच्छतेसाठी २ ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे. पंरतु यासाठी आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध न झाल्यास ही डेडलाईन पाळणे कठीण होईल. या पार्श्वभूमीवर सोमवारी घनकचरा विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी महापालिकेच्या सर्व अभियंत्यांची बैठक घेऊन जे ठेकेदार मंगळवार सकाळपर्यंत मनुष्यबळ देणार नाही, त्याची कामे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले.    -----------------------ठेकेदारांकडून १ हजार ७२५ मनुष्यबळाची अपेक्षानगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय -२००, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय -१००, ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालय-१००, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय-२२५, शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय-५०, कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालय-१००, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय-१००, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय-१५०, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय-१५०, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय-१५०, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय-१५०, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय-१५०, कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय आणि विबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय-१००, असे एकूण १ हजार ७२५ मनुष्यबळ पुरविण्याचे आदेश महापालिकेने ठेकेदारांना दिले आहेत. .....

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfloodपूरRainपाऊस