कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 01:02 PM2020-03-13T13:02:01+5:302020-03-13T13:20:06+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या असून नागरिकांना दक्षतेचे आवाहन

Cancellation of all programms of Pimpri Municipal Corporation in the wake of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द

Next
ठळक मुद्देतीन रुग्ण आणि संशय आल्याने स्वत:हून दोघे वायसीएम रुग्णालयात दाखलकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सज्ज झाली असून जाहिर

पिंपरी : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केलेल्या पाच संशयितांपैंकी तीन पुरुषांच्या घश्यातील द्रवाचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आले नाहीत, असे वैद्यकीय विभागाचे मत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा सामना करण्यासाठी तयारी केले आहे. नागरिकांनी कोरोना संदर्भातील माहितीसाठी सारथी हेल्पलाईनच्या ८८८८००६६६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. तसेच महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या असून नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज बैठका घेतल्या. उपाययोजनांबाबत बैठक झाली. महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, झामाबाई बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आदी उपस्थित होते.

...............................

दोघांचे अहवाल निगेटिव्ह
आयुक्त म्हणाले, दुबईतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या तीन रुग्ण आणि संशय आल्याने स्वत:हून दोघे वायसीएम रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी दुबईवरुन आलेल्या तीन पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, दोघांचे अहवाल निगेटीव्ह आले असून त्यांना घरी सोडले आहे.

 .......................................

नावे ठेवणार गोपनीय
कोरोनाबाधितांची नावे गोपनीय ठेवण्यात यावीत. त्यांच्या कुटुबियांची माहिती प्रसारित करु नये  कोरोना बाधितांच्या चारतासापेक्षा जास्त संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांच्या नमुण्यांची तपासणी सुरु केली आहे. परदेशातून  शहरात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे.
.............................

महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सज्ज झाली असून जाहिर कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन केले आहे. महापालिकेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यापुढे महापालिका एकही सार्वजनिक कार्यक्रम घेणार नाही. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येणारे खासगी कार्यक्रम पुढे ढकलावेत, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

...........................

* अशी आहे व्यवस्था......
महापालिकेच्या वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष सज्ज केला आहे. तर, सात खासगी रुग्णालयात साठ आयसोलशन बेड उपलब्ध केले आहे.  भोसरीतील रुग्णालयात साठ बेडचे विलगीकरण कक्ष तयार केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु केली असून गुरूवारी संध्याकाळपर्यंत चाळीस बेड तयार केले जातील.  उर्वरित बेड उद्या तयार केले जाणार आहेत. याशिवाय पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात साठ बेड तयार आहेत. त्यातील २० बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
..................................

* अशी घ्यावी काळजी
पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांनी घाबरुन न जाता वैयक्तीक काळजी घ्यावी. हस्तांदोलन टाळावे, खोकताना तोंडाला रुमाल धरावा. सर्दी, खोकल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सुचनांनुसार तपासणी करुन घ्यावी, खोकला, सर्दी असल्यास  घरात बंदिस्त रहावे.   तसेच राज्य सरकारच्या १०४ या हेल्पलाईनवर देखील माहिती मिळेल. मास्क कोणी वापरायाचा हे वैद्यकीय विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे वैद्यकीय सल्यानुसारच मास्कचा वापर करावा. तंदुरुस्त असणा-यांनी मास्कचा वापर करणे टाळावे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

Web Title: Cancellation of all programms of Pimpri Municipal Corporation in the wake of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.