कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा पाठलाग करून केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:16+5:302021-01-03T04:12:16+5:30

पुणे : कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिला टिंगरेनगर रस्त्यात अडवून जबरदस्तीने गाडीवर बसविले आणि खराडी ...

Called and raped a young woman working in a call center | कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा पाठलाग करून केला बलात्कार

कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा पाठलाग करून केला बलात्कार

Next

पुणे : कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिला टिंगरेनगर रस्त्यात अडवून जबरदस्तीने गाडीवर बसविले आणि खराडी परिसरातील ओसाड भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी पहाटे तीन ते चार दरम्यान घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

धानोरी परिसरातील एका २० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार एका मोटारसायकलवरील तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास ती दुचाकीवरून धानोरीला घरी चालली होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून टिंगरेनगर परिसरात अडविले. त्यानंतर तिला मारहाण करून त्याच्या दुचाकीवर बसविले. तरुणीला पुन्हा खराडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेऊन बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरूणीला गुंजन चौक परिसरात आणून सोडल्यानंतर तिने मित्राला घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

Web Title: Called and raped a young woman working in a call center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.