शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
3
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
4
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
5
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
6
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
7
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
8
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
9
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
10
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
11
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
12
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
13
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
14
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
15
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
16
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
17
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
18
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
19
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
20
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला

हजारो अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे कॉल सेंटर उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 4:01 PM

कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना बनावट नाव धारण करुन ते सोशल सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्टेशन विभागातून बोलत असल्याचे सांगत...

ठळक मुद्दे सायबर पोलिसांनी कारवाई : दोघांना अटक

पुणे : ड्रग्स ट्रॅफिकिंगसाठी तुमचा सोशल सिक्युरिटी नंबरचा वापर झाला असल्याची भिती दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणुक करणारे कॉल सेंटर सायबर पोलिसांनी उद्धवस्त केले आहे़. यामधील दोघांना अटक केली आहे़.कॅम्पमधील प्लेस ऑफ वर्कशिप बिल्डिंगमध्ये किंगस्टन मिडिया या नावाने हे कॉल सेंटर चालविले जात होते़. या कॉल सेंटरमधून हजारो अमेरिकन नागरिकांची फसवणुक केली गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे़. आकीब अल्ताफ शेख (वय २७, रा़ साईबाबा नगर, कोंढवा) आणि सारीम अमान शेख (वय २९, रा़ भिमपुरा गल्ली, कॅम्प) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़ या ठिकाणी त्यांनी ८ जणांना कामाला ठेवले होते़. या कॉल सेंटरमधून ३ मोबाईल, १० संगणक हार्ड डिस्क, ३ राऊटर, ८ हेडफोन, १ पेनड्राईव्ह, स्क्रिनशॉटचे ३० पाने असा माल हस्तगत केला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कॅम्पमधील या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना बनावट नाव धारण करुन ते सोशल सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्टेशन विभागातून बोलत असल्याचे सांगत. त्यांच्या सोशल सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्टेशन नंबरवरुन अनयुज्वल अ‍ॅक्टिव्हिटी करण्यात येत असल्याची भिती दाखवत़ व अमेरिकन नागरिकांना त्यांचे नाव, पत्ता व सोशल सिक्युरिटी नंबर विचारतात. त्यानंतर तपासणी केल्याचे दर्शवून त्यांचा सोशल सिक्युरिटी नंबरचा वापर ड्रग्स ट्रॅफिकिंगसाठी झाला आहे, असे सांगून सेटलमेंटसाठी युएसए ट्रेझरी विभागाशी संपर्क करा असे सांगतात. त्यानंतर कॉल फिसमधील दुसऱ्या क्रमांकावर तो कॉल फॉरवर्ड करुन ते युएसए ट्रेझरी विभागामधून बोलत असल्याचे सांगत़ अमेरिकन नागरिकांना कारवाईची भिती दाखवून अमेरिकन नागरिक सेटलमेंटसाठी तयार झाल्यावर त्यांना २०० ते ५०० डॉलरचे वॉलमार्ट गिफ्टकार्ड, ईबे गिफ्टकार्ड, टारगेट गिफ्टकार्ड, बेस्टबाय गिफ्टकार्ड यांची खरेदी करायला सांगत़. त्यांच्याकडून त्या गिफ्ट कार्डचा नंबर घेऊन त्या कार्डाचे पैश्यात रुपांतर करुन घेऊन अमेरिकन नागरिकांची फसवणुक करीत असल्याचे उघड झाले आहे़. याबाबत अमेरिकेतून तक्रार आल्यानंतर सायबर पोलिसांनी कॅम्पमधील या कॉल सेंटरवर छापा घातला. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर धावटे, हवालदार अस्लम अत्तार, पोलीस नाईक अजित कुऱ्हे , योगेश वाव्हळ, संतोष जाधव, प्रसाद पोतदार, प्रविणसिंग राजपूत, ज्योती दिवाणे यांनी केली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाfraudधोकेबाजीPoliceपोलिस