शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोटयावधींच्या अनावश्यक खर्चांवर कॅगचे गंभीर आक्षेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 12:51 IST

१ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीमधील आर्थिक व्यवहारांचे कॅगकडून लेखा परीक्षण करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे अधिसभेत आज सादर होणार अर्थसंकल्प बांधकामावरील खर्चामध्ये कोटयावधींचे नुकसान

- दीपक जाधव- पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीमधील आर्थिक व्यवहारांचे कॅगकडून लेखा परीक्षण करण्यात आले असून यामध्ये बांधकामे, मुद्रणालय, दगडी भिंतीचे बांधकाम, पदनाम वेतनश्रेण्यांसाठी पैसे उचलणे, विद्यार्थी सुविधा केंद्राचे रखडलेले बांधकाम आदी अनेक बाबींवर कोटयवधींचा अनावश्यक खर्च केल्याचे तसेच विलंब केल्याने तोटा झाल्याचे गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. याबाबत अधिसभा काय भुमिका घेणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वषार्चा वार्षिक अर्थसंकल्प शनिवार, दि. २० एप्रिल २०१९ रोजी अधिसभेसमोर मांडला आहे. २०१२ ते २०१६ या वषार्तील आर्थिक व्यवहारांचे लेखा परीक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल विद्यापीठाला सादर करण्यात आला आहे. त्याबाबतचा कृती अहवालही विद्यापीठ प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. नुकताच तो विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. मात्र याबाबत अधिसभेत अथवा व्यवस्थापन परिषदेमध्ये अद्याप चर्चा झालेली नाही. शनिवारी सादर होणाºया अर्थसंकल्पाच्या अधिसभेत याबाबत सदस्यांकडून चर्चा होणार का याकडे लक्ष लागले आहे.  मुद्रणालयाच्या उत्पन्नापेक्षा ८२ पटींनी जादा खर्चसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्वत:चे मुद्रणालय आहे. या विद्यापीठाच्या कामकाजासंबंधी बहुतांश छपाई या मुद्रणालयातून होत होती. मात्र नंतरच्या काळात मुद्रणालयाचे आधुनिकरण न करता विद्यापीठातील छपाईची बहुतांश कामे आऊटसोर्स केली जात आहेत. कॅगच्या अहवालानुसार सन २०१४ ते २०१५ या काळात उत्पन्नापेक्षा ८२ पटीने जादा खर्च मुद्रणालयावर झाला आहे. सन २०१३ ते २०१६ या काळात मुद्रणालयास ३.९ कोटी रूपयांचा तोटा झाल्याचे या अहवालात नमूद केले आहे. उत्तरपत्रिकांसाठी बारकोड पध्दत लागू केल्याने खर्चात वाढ झाल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. अंतर्गत दगडी बांधकामांवर कोटयावधींचा खर्चविद्यापीठातील अनेक विभाग, पुतळे यांना सीमा भिंती घालण्यासाठी दगडी बांधकाम करून कोटयावधी रूपयांचा खर्च करण्यात आला. वस्तूत: विद्यापीठाच्या चार बाजूंच्या सिमा भिंती मजबूत करण्याची आवश्यकता असताना विभाग, इमारती, पुतळे यांच्या भोवती दगडी बांधकाम करण्यात आले. सन २०१२ ते २०१६ या कालावधीमध्ये यावर १० कोटी रुपए खर्च करण्यात आले आहे. यावर कॅगकडून आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. .....

राज्यपालांकडे कृती अहवाल पाठविलाकॅगचा २०१२ ते २०१६ चा लेखा परीक्षण अहवाल व त्याबाबतचा विद्यापीठाचा कृती अहवाल विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. सीए अतुल पाटणकर, वित्त व लेखाअधिकारी......विद्यापीठात सन २०१२ ते २०१६ या कालावधीमध्ये मोठयाप्रमाणात इमारतींचे बांधकाम झाले. या बांधकामाला विलंब होणे व इतर अनेक कारणांनी विद्यापीठाचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अ?ॅकॅडमिक स्टाफ कॉलेज गेस्ट हाऊस, कॅप भवन, प्लेसमेंट सेल बिल्डिंग, लायब्ररी बिल्डिंग आदींच्या बांधकामाबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

...............

कॅगच्या अहवालातील इतर आक्षेप- पेन्शन स्कीम मध्ये ११. ५४ कोटी रुपए पगारातून कापले नाही - कर्मचारी वसाहतीच्या गैरवापरामुळे १२.५० लाख रूपयांचे नुकसान- अंतर्गत लेखा परीक्षण कक्ष अकार्यक्षम- नगर येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या जमिनीवर अतिक्रमण- राज्य शासनाच्या परवानगी शिवाय कॉन्ट्रॅक्टवर अधिकारी व कर्मचारी नियुक्ती- ठेकेदारांना दिलेल्या अ?ॅडव्हान्सची रक्कम परत न घेणे- सोलर पॉवर खरेदीमध्ये पारदर्शक नाहीराज्यपालांकडे कृती अहवाल पाठविला

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकरMONEYपैसा