शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
3
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
4
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
5
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
6
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
7
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
8
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
9
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
10
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
11
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
12
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
13
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
14
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
15
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
16
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
17
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
18
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
19
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
20
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान

अलविदा रत्नागिरी हापूस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:36 PM

हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात मागली तीन आठवड्यांपासून सामान्यांच्या आवाक्यात भाव आले होते़.

ठळक मुद्देओखी वादळामुळे रत्नागिरी हापूसची आवक तुलनेत कमी कर्नाटकमध्येही यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याच्या उत्पादनात घट

पुणे: यंदाचा रत्नागिरी हापूसचा हंगामा अखेर संपला असून, सध्या शिल्लक असलेल्या मालाची विक्री केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पुणेकर रत्नागिरी हापूसच चव चाखत होते. दर वर्षीच्या तुलनेत यंदा रत्नगिरी हापूसची आवक अवघी २० ते ३० टक्के इतकीच राहिली. यामुळे ऐन हंगामात देखील रत्नागिरी आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला नाही. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात मागली तीन आठवड्यांपासून सामान्यांच्या आवाक्यात भाव आले होते़ याबाबत आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, गेल्या आठवड्यापासून बाजारात रत्नागिरीची आवक तुरळक प्रमाणात सुरु होती. परंतु, रविवारी ही आवक पूर्णपणे बंद झाली. ओखी वादळामुळे रत्नागिरी हापूसची आवक तुलनेत कमीच राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्नाटक हापूसचाही हंगाम उशिरा सुरु झाला आणि कर्नाटकमध्येही यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याच्या उत्पादनात घट झाली़. रविवारी कर्नाटक हापूसची वीस हजार पेट्यांची आवक झाली असून आणखी दहा दिवस कर्नाटक हापूसचा हंगाम सुरु राहील अशी माहिती व्यापारी रोहन उरसळ यांनी व्यक्त केली़.गावरान हापूसला मागणी वाढलीगावरान हापूस आंब्याची आवक वाढली असून नागरिकांकडून मागणीही चांगली आहे. रविवारी मार्केटयार्डात हवेली आणि मुळशी तालुक्यातील गावातून नैसर्गिकरित्या पिकविलेल्या गावरान हापूसची १०० क्रेट इतकी आवक झाली़ प्रत्येक क्रेटमध्ये ७ डझन आंबे असतात़ प्रतिडझन आंब्यास दोनशे रुपये भाव मिळाला़ गावरान हापूस आंबा नैसर्गिक रित्या पिकविलेला असल्यामुळे चवीला गोड आहे़  येत्या आठवड्यात आणखी आवक वाढेल असा अंदाज व्यापारी तात्या कोंडे यांनी व्यक्त केला़ गावरान हापूसचा हंगाम ३० जुनपर्यंत सुरु राहील असेही त्यांनी सांगितले़

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाRatnagiriरत्नागिरीKarnatakकर्नाटकMarket Yardमार्केट यार्ड