Pune News: बंद घराचे कुलूप तोडून ३० तोळे सोन्यासह २९ लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 12:46 PM2023-07-11T12:46:41+5:302023-07-11T12:48:20+5:30

देवघर व कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १२ लाखांची रोकड, ३० तोळे सोन्याचे दागिने असा २९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला...

By breaking the lock of a closed house, 30 tolas of gold and 29 lakhs were stolen | Pune News: बंद घराचे कुलूप तोडून ३० तोळे सोन्यासह २९ लाखांचा ऐवज लंपास

Pune News: बंद घराचे कुलूप तोडून ३० तोळे सोन्यासह २९ लाखांचा ऐवज लंपास

googlenewsNext

पुणे : न्यू कोपरे गावातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १२ लाख रुपयांची रोकड, ३० तोळे सोन्याचे दागिने असा २९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अक्षय नाणेकर (वय ३०, रा. जयश्री निवास, न्यू कोपरे गाव) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास डोणजे येथे गेले होते. त्यांची पत्नी बहिणीचे लग्न असल्याने चार दिवसांपूर्वी पाषाण येथे गेल्या होत्या. मध्यरात्री २ वाजता फिर्यादी परत घरी आले. या दोन तासांच्या अवधीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. देवघर व कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १२ लाखांची रोकड, ३० तोळे सोन्याचे दागिने असा २९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलिस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

Web Title: By breaking the lock of a closed house, 30 tolas of gold and 29 lakhs were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.