शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोने खरेदी विक्रीतून नफा मिळवून देतो; आमिष दाखवत ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक

By नितीश गोवंडे | Updated: July 17, 2024 15:42 IST

सोने-खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगून ज्येष्ठाचा विश्वास संपादन केला

पुणे: सोने खरेदी-विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  हा प्रकार कोथरूड परिसरातील यश एलिना बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. मयूर फडके (रा. बंधुप्रेम सोसायटी, कर्वेनगर) असे आरोपीचे नाव आहे.

एरंडवणे परिसरात राहणाऱ्या अशोक चुनीलाल कटारिया (६४) यांनी मंगळवारी (दि. १६) अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर फडके याच्यावर फसवणुरीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर व फिर्यादी यांची ऑक्टोबर २०२३ मध्ये ओळख झाली. त्यावेळी मयूर याने सोने-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. सोने-खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना सोने खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. मयूर याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आरोपीला २० लाख रुपये रोख स्वरुपात दिले. 

पैसे घेतल्यानंतर मयूर फडके याने फिर्यादी यांना नफा अथवा घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. फिर्यादी यांनी वारंवार पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कटारिया यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोकडे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीMONEYपैसा