शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

कोरोनाच्या संकटातून सावरताना उद्योजकांना सरकारकडून अधिक सवलतींची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 16:40 IST

कोरोना लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच उद्योग बंद...

ठळक मुद्देकर्जहप्ते सहा महिने स्थगित: वीज,पाणी बिलात हवी सवलत

पुणे: कोरोना लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने सरकारकडून कर्जदार उद्योजकांना त्यांच्या कर्जाचे हप्ते जमा करण्यासाठी ३ महिन्यांची मुदत दिली होती. ती आता ६ महिने करण्याचा विचार सुरू आहे. ही मुदत तर वाढवावीच शिवाय सरकारने आणखी काही सवलती द्याव्यात अशी उद्योजकांची अपेक्षा आहे.त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातूनही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होणार आहे. या निर्णयामुळे त्यांचे कर्जाचे येणे हप्ते थकले तरीही ते खाते नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेटमध्ये जाणार नसल्याने हा निर्णय त्यांंना फायदेशीर असल्याचे सांगण्यात येत आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच उद्योग बंद आहेत. मालकांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी गंगाजळीचा वापर करावा लागत आहे. अनेक उद्योजकांनी व्यवसायच्या वाढीसाठी बँकांकडून मोठी कर्ज काढली होती. त्या कर्जाचे त्यांचे हप्तेही थकले आहेत. त्यामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदार उद्योजकांना कर्जहप्ते जमा करण्यासाठी ३ महिन्यांची मुदत दिली होती. यादरम्यान लॉकडाऊन संपून ऊद्योग सुरू होतील अशी अपेक्षा होती.मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढला. मार्चनंतर पूर्ण एप्रिल व आता मे सुद्धा लॉकडाऊन मध्येच जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच ३ महिन्यांची सवलत ६ महिने करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष प्रदीप भार्गव यासंदर्भात लोकमत बरोबर बोलताना म्हणाले, ३ महिन्यांची मुदत देण्यामागे २ महिना लॉकडाऊन व २ महिने स्थिती पुर्ववत होऊन ऊत्पादन व ऊत्पन सुरू असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अजूनही लॉकडाऊन सुरूच आहे. त्यामुळे ऊत्पन बंदच आहे. असे असताना कर्ज हप्त्याला ६ महिने करून द्यायलाच हवेत. त्याशिवाय वीजबील, पाणीबील, काही कर यातही सरकारने सवलत द्यायला हवी. ऊत्पादन सुरू झाले की लगेच फायदा असे होत नाही. त्यामुळे सरकारने किमान वर्षभर तरी उद्योजकांना आवश्यक त्या सर्व सवलती जाहीर करायला हव्यात.उद्योजकांची कर्ज मोठ्या रकमेची असतात. व्यवसायात वाढ होणार असे ग्रुहीत धरून त्यावरचे मोठे व्याजही मान्य केलेले असते. या व्याजाचा दरही कमी केला जावा अशी उद्योजकांची अपेक्षा असल्याचे भार्गव यांनी सांगितले.अर्थतज्ज्ञ व बँकिंग क्षेत्राचे ज्येष्ठ अभ्यासक विद्याधर अनास्कर म्हणाले. या निर्णयाचा बँकानाही फायदा होणार आहे. कर्जदाराचे हप्ते ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ थकले तर बँकांना त्यांच्या नफ्यातून त्याची व्यवस्था करावी लागते. अन्यथा त्यांच्या एनपीएत वाढ होते. ती बँकेच्या दजार्ला मारक असते. त्यातून चुकीचा ताळेबंद सभासदांसमोर सादर केला जातो. बँकेच्या नफ्यात घट होते. सरकारच्या निर्णयामुळे ते होणार नाही.कर्ज देताना बँकांनी कर्जदाराच्या व्यवसायात वाढ होईल असे ग्रुहीत धरलेले असते. त्या उत्पन्नातून कर्ज व व्याज वसूल होणे अपेक्षित असते. कर्जदाराने त्याचे अँसेट विकून कर्ज फेडावे अशी कोणत्याही बँकेची कधीच अपेक्षा नसते. त्यामुळेच सरकारच्या कर्जदाराला मदत करण्याच्या निर्णयाशी बँकिंग क्षेत्रानेही सहमत असावे असे मत अनास्कर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbankबँकState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय