बाप्पा मोरया! भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन, शिवाजीनगर आगार वाकडेवाडीतून बससेवा

By अजित घस्ते | Published: January 15, 2024 05:07 PM2024-01-15T17:07:48+5:302024-01-15T17:09:45+5:30

दर्शनासाठी जाणार्‍या प्रत्येक प्रवाशाला ९९० रुपये तिकीटाचे भाडे असून, जेवणाचा खर्च व इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचा आहे

Bus service for devotees from Shivajinagar Agar Vakdewadi for darshan of Ashtavinayaka | बाप्पा मोरया! भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन, शिवाजीनगर आगार वाकडेवाडीतून बससेवा

बाप्पा मोरया! भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन, शिवाजीनगर आगार वाकडेवाडीतून बससेवा

पुणे: अष्टविनायकाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी शिवाजीनगर आगारातून दि. २९ जानेवारी रोजी अष्टविनायक दर्शन साधी बस सेवा चालू करण्यात येत आहे. सदरची बस शिवाजीनगर आगार वाकडेवाडी येथून सकाळी ७ वा. सुटून ओझर येथील भक्तीनिवास येथे मुक्कामासाठी थांबेल. दुसर्‍या दिवसी रात्री १० पर्यंत शिवाजीनगर येथे परत येईल.

दर्शनासाठी जाणार्‍या प्रत्येक प्रवाशाला ९९० रुपये तिकीटाचे भाडे असून, जेवणाचा खर्च व इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचा आहे. सदर सेवा ही आरक्षण प्रणालीसाठी ATHVNK सांकेतिक कोड नुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर व इतर संकेतस्थळावरून देखील आरक्षण करता येईल. सदर सेवा ही अल्प दरात असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी केले आहे.

Web Title: Bus service for devotees from Shivajinagar Agar Vakdewadi for darshan of Ashtavinayaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.