शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बस चालकाला अखेर अटक; सीसीटीव्हीद्वारे गुन्ह्याची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 10:30 IST

अपघातात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या बस चालकाचा सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला

पिंपरी : दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस आणि दुसऱ्यास जखमी करण्यास कारणीभूत ठरलेल्या बस चालकास पोलिसांनीअटक केली. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी बसचा शोध घेत या गुन्ह्याची उकल केली. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली.

प्रकाश शामराव बुरंगे (वय २७, रा. वृंदावन कॉलनी, काळेवाडी), असे अटक केलेल्या आरोपी बस चालकाचे नाव आहे. शुभम बबन गायकवाड (वय २०, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर नंदू ज्ञानेश्‍वर लोखंडे हा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात २८ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास बारणे कॉर्नर, थेरगाव येथे घडली. 

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम गायकवाड आणि जखमी नंदू लोखंडे हे दोघे २८ डिसेंबरला दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला एका बसने धडक दिली. यात शुभमचा मृत्यू झाला. तर लोखंडे जखमी झाले. अपघात घडल्यावर बसचालक बससह पळून गेला. कोणालाही बसचा क्रमांक माहिती नव्हता. केवळ बसच्या खिडकीच्या खाली पिवळ्या रंगाचे रेडिअम पट्टी आणि त्याखाली निळ्या रंगाचा पट्टा आहे, एवढीच माहिती उपलब्ध होती. अपघाताच्या वेळेचे पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र अपघाताची वेळ रात्रीची असल्याने काहीच ठोस माहिती मिळत नव्हती. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात एक बस दिसून आली. सदर बस थेरगाव येथील हॉस्पिटल येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून बस चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली दिली.  

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, संतोष पाटील, उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस कर्मचारी प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकBus Driverबसचालक