शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सहलीसाठी निघालेली बस पुलावरून कोसळली :२ ठार, २४ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 16:49 IST

कोकणात सहलीसाठी निघालेली खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हीणी घाटातील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर बसमधील इतर २४ जण जखमी झाले आहेत.

पुणे : कोकणात सहलीसाठी निघालेली खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हीणी घाटातील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर बसमधील इतर २४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात(ता.२७) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडला. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.संजिवनी निवृत्ती साठे (वय. ५५, रा. डी. पी. रोड औंध) व ही महिला जागीच ठार झाली आहे. तर योगेश पाठक, रा.नवी पेठ, पुणे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पुनम योगेश लांडे (वय. ३४), हर्षवर्धन योगेश लांडे (वय. ७), दक्ष जाधव, रियांश जाधव, ऋषा जाधव, ऋषिकेश कोंढाळकर, शितल विशाल काळे, विशाल शिवाजी काळे, लौकिक विशाल काळे, स्मिता विलास सुर्यवंशी, रेश्मा प्रशांत जाधव, पुष्पा कोंढाळकर, बाळासाहेब पवार, तनिष्का गोफणे, माणिक काळे, निवृत्ती साठे, अनघा जाधव, अनिल पवळे, प्रभा पवार, योगेश पाठक, विधीता जाधव, श्रावणी पाठक आणि बसचालक अशी जखमींची नावे आहेत. काही जणांवर मुळशी, औंध आणि पौड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कुटुंबातील लोक आणि त्यांचे नातेवाईक असे २६ जण खासगी बसने कोकणात सहलीसाठी निघाले होते. पुण्यातून रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची बस मार्गस्थ झाली. त्यानंतर ताम्हीणी घाटातून ही बस कोकणात जाण्यासाठी रवाना झाली. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही बस ताम्हीणी घाटातील वंदन हॉटेलच्या समोर आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस एका पुलावरून खाली ओढ्यात कोसळली. रात्री झोपेत असताना अचानक हा प्रकार घडल्याने कोणालाही काही समजले नाही. त्यानंतर काही जण बसमधून बाहेर पडले. तेथे मोबाईलला नीट सिग्नल मिळत नव्हते. त्यामुळे थोडेसे पुढे येऊन एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून पौड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर यात एक महिला आणि एका पुरुषाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. जखमींवर मुळशीमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातBus DriverबसचालकDeathमृत्यू