शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

आंबेगाव तालुक्यात कळंबला बस, मोटारीची समोरासमोर धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 19:02 IST

कळंब येथे एसटी बस आणि चारचाकी वाहनांची धडक झाली.

ठळक मुद्देबस चालकाच्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली : चार जण किरकोळ जखमी 

मंचर :  कळंब (ता. आंबेगाव)  येथील तिरंगा ढाब्यासमोर सोमवारी (दि २०) सकाळी सव्वासहाच्या सुमारास एस टी बस आणि चारचाकी वाहनांची धडक झाली. बस चालकाने दाखलवेल्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. गाडीतील ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर मोटारीतील एअर बॅग उघडल्याने गाडीतील ३ प्रवाशी बचावले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पुणे बस (एमएच- ४०. एन. ९५३०) आणि  मोटार (एमएच- १२ जेएक्स. ००७६) यांचा अपघात झाला. एसटी बस चालक जगन्नाथ भोर यांनी प्रसंगावधान राखत बस पलीकडच्या ओढ्यात बस दाबल्याने बसमधील चार प्रवासी काहीही ईजा न होता बचावले. तसेच गाडीतील तीन प्रवासी सुदैवाने  गाडीची एअरबॅग वेळत उगलड्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेनंतर या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. बाळासाहेब भालेराव, संजय उर्फ नागेश भालेराव, मारुती गोपाळे, विजय भालेराव, राजेंद्र भालेराव, गोकुळ भालेराव, वाहक ज्ञानेश्वर कांगले, बसचालक जगन्नाथ भोर यांच्यासह आदींनी पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करण्याकामी मदत केली. घटनास्थळी नारायणगाव बस स्थानकाचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक महेश विटे यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी त्यांनी सांगितले की बसचे जवळपास ३५ ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. घटनास्थळी नऊच्या दरम्यान मंचर पोलीस स्थानकाचे कर्मचारी वर्गाने येवून पंचनामा केला. व वाहतूक सुरळीत करणे कामी मदत केली. या अपघातामुळे सहाणे मळा वस्तीपर्यंत आणि मंचर खिंडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून रस्ता पूर्णपणे जाम झाला होता. ट्राफिक जाम झाल्यामुळे वाहन काढताना गाडी पुढे घेताना बाचाबाची  वाहनचालक करत होते. अपघातानंतर कामावर जाणारे चाकरमाने, प्रवासी, तरूण, नागरिक जवळपास दोन ते तीन तास वाहन कोंडीत अडकून पडले. कळंब बाह्यवळणाचे काम प्रलंबित असल्याने अपघातानंतर नेहमीच दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागून पुणे नाशिक महामार्ग जाम होवून प्रवासी बांधवांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघात संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

टॅग्स :ambegaonआंबेगावAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस