शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांवरचा दरवाढीचा बोजा कायम; ज्येष्ठ नागरिक, ५० हजार विद्यार्थी वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 06:12 IST

पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे.

पुणे : पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे. १० ते ११ हजार ज्येष्ठ नागरिक व सुमारे ५० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना यामुळे दरमहा जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर अंतरानुसार रक्कम होते, त्यात सवलत देणारा पास तर रद्दच करण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना गरज नसतानाही आॅल रूट्सचा ७५० रुपयांचा पास घ्यावा लागतो. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजुरीच घेतली नसल्याची टीका यावर होत आहे.पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना सवलतीच्या दरात प्रवासी पास दिला जातो. आॅगस्ट २०१७मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही वाढ केली गेली. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासचा दर ४५० रुपयांहून एकदम ७०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ ५६ टक्के आहे. विद्यार्थ्यांच्या पासचा दर ६०० रुपये होता. तो आता ७५० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ २५ टक्के आहे. सामान्य प्रवासी पासचा दर १ हजार २०० रुपये होता, तो १ हजार ४०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ १७ टक्के आहे.यात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत शहराचा मध्यभाग सोडून उपनगरांमध्ये राहायला गेलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. ४५० रुपयांऐवजी त्यांना एकदम ७०० रुपये म्हणजे २५० रुपये जास्तीचे दरमहा मोजावे लागत आहेत. त्यातही अंतराचा पास तर बंदच केल्यामुळे प्रवासाचे अंतर कमी असेल, तरीही या विद्यार्थ्यांना पाससाठी ७०० रुपयेच द्यावे लागत आहेत.वास्तविक, सवलतीपोटी पीएमपी काहीही तोटा होत नाही, कारण जेवढ्या रकमेची सवलत दिली जाते, तेवढी रक्कम महापालिका त्यांना अदा करते. १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत अथवा महाविद्यालयात जाण्यासाठी सवलतीच्या पासचा लाभ घेतात. त्यांना वाढीव दर द्यावा लागत असल्यामुळे पालकही त्रस्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही पीएमपीच्या या दरवाढीचा त्रास होत आहे. महापालिका अनुदान देत असूनही पीएमपीने दर वाढविण्याचे कारण काय, याचे स्पष्टीकरण कोणीही देत नाही. महापालिकेकडून अदा होणारे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे पाससाठी जे पैसे रोख मिळतात त्यात वाढ व्हावी, या हेतूने ही वाढ करण्यात आली असल्याचे समजले.ही दरवाढ झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटना, प्रवासी संघटना यांच्याकडून बरीच टीका झाली. त्याची महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तसेच विरोधी पक्षांनीही दखल घेतली व पीएमपीच्या अधिकाºयांना बैठकीस बोलावले. मात्र, त्यांनी दुय्यम अधिकारी पाठवल्यामुळे ती बैठकच झाली नाही. नंतर मात्र महापालिका पदाधिकाºयांनीच पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली व दरवाढीबाबत चर्चा केली. त्यात याबाबत विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, आता त्याला महिना होऊन गेला तरीही काही झालेले नाही.पदाधिकारीही हे विसरून गेले आहेत व पीएमपीही. त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून दरमहा जास्तीचीच रक्कम घेतली जात आहे.प्रवासी मंचाचा लढा कायममहापालिका पदाधिकाºयांनी या दरवाढीविरोधात आवाज उठवणे बंद केले असले, तरी प्रवासी मंचाने मात्र आपला विरोध सक्रिय ठेवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र पाठविले असून या बेकायदा दरवाढीची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ राव यांनाही या दरवाढीची दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे. अनुदान मिळत असतानाही दरवाढ करण्याचे काही कारणच नाही, असे मंचाचे म्हणणे आहे.सप्टेंबरमध्ये पासचे नूतनीकरण करून घेण्यासाठी गेलेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना जास्तीची रक्कम मागितली जात आहे. अंतराचे पास बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. सवलतीचा पास काढायचा असेल, तर ७५० रुपयेच द्यावे लागतील, असे सांगण्यात येते. जुन्या दराने पास द्यायला नकार देण्यात येतो. पालकांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यामुळे संतापाचे वातावरण आहे.