मौजमजेसाठी सायकलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:59+5:302021-02-05T05:18:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेसाठी महागड्या सायकलींची चोरी करून संकेतस्थळासह परस्पर विकणाऱ्या बंटी बबलीला येरवडा पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ...

Bunty-Babli arrested for stealing bicycle for fun | मौजमजेसाठी सायकलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक

मौजमजेसाठी सायकलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मौजमजेसाठी महागड्या सायकलींची चोरी करून संकेतस्थळासह परस्पर विकणाऱ्या बंटी बबलीला येरवडा पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ४१ हजार ५०० रुपयांच्या सहा सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांत येरवडा भागातून महागड्या सायकलींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. पुणे-नगर रस्त्यावरील वाडिया बंगल्याजवळ एक अल्पवयीन मुलगा आणि युवती थांबले असून, नागरिकांना सायकल विक्री करत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस शिपाई समीर भोरडे, सुनील नागलोत आणि किरण घुटे यांना मिळाली. पोलिसांनी सतरा वर्षीय मुलगा आणि त्याच्याबरोबर असलेल्या एकोणीस वर्षीय युवतीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मौजमजेसाठी सायकली चोरल्याची कबुली दिली. दोघांनी काही सायकली संकेतस्थळाच्या माध्यमातून विक्री केल्याची माहिती तपासात उघड झाली.

त्यांच्याकडून सहा सायकली जप्त करण्यात आल्या असून, तीन सायकली महागड्या आहेत. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, अजय वाघमारे, सहायक निरीक्षक समीर करपे, गणपत थिकोळे यांनी ही कारवाई केली.

---

Web Title: Bunty-Babli arrested for stealing bicycle for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.