शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार

By नितीश गोवंडे | Updated: May 22, 2024 06:46 IST

कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

नितीश गोवंडे/सुमित डोळे -

पुणे/छत्रपती संभाजीनगर : पुण्यात अलिशान पोर्शे कारखाली दोन जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक करण्यात आली. कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

रविवारी मध्यरात्री अपघात झाल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवाल अटक होण्याच्या भीतीने गायब झाला होता. पुणे पोलिसांनी<तांत्रिक माहितीच्या आधारे अग्रवालचा छडा लावला व त्याला अटक करून पुण्यात आणले. पोलिसांना चकवा देण्यास अग्रवालने कारचालकांना दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबविले होते.

कोणत्याही परिस्थितीत अग्रवाल सुटता कामा नये, असे आदेश पुणे पोलिस आयुक्तांकडून छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना देण्यात आले होते. अग्रवाल ताब्यात येईपर्यंत पोलिस आयुक्त अमितेश कुमार सतत पोलिस पथकांच्या संपर्कात होते. मध्यरात्री एक ते चार वाजेपर्यंत पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना सुमारे ६० कॉल केले.

फोन केला बंदविशाल अग्रवालने त्याचा फोन बंद करून ठेवला होता. चालक चत्रभुज डोळस (३४) व सहकारी राकेश पौडवाल (५१) हे मराठवाड्यातील असल्याने त्यांनीच छत्रपती संभाजीनगरकडे जाण्याचे सुचविले. पुणे पोलिसांनी अग्रवालच्या जवळच्या लोकांचे फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली. यावरून त्याचा छडा लागला. अग्रवालला त्याच्या सूत्रांमार्फत पोलिसांच्या कारवायांमार्फत माहिती मिळत होती. 

‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने अपघातापूर्वी पार्टीत दोन तासांत मद्य व जेवणावर मित्रांसोबत ४८ हजार रुपये उडवल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली. अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांनी हाॅटेल कोझी आणि हाॅटेल ब्लॅकमध्ये मद्य प्राशन केले. पोलिसांनी दोन्ही हाॅटेलमधील चित्रीकरण तपासले. हाॅटेलमधील बिल मुलाने ऑनलाइन दिल्याचे उघडकीस आले आहे. 

राहुल गांधी म्हणाले, निबंधाची शिक्षा का?बसचालक, साधा रिक्षाचालक यांच्याकडून अपघात झाला तर त्याला १० वर्षांची शिक्षा होते, पण एका श्रीमंत बापाच्या पोराने आलिशान गाडीने दोघांना ठार केले तर साधी निबंध लेखनाची शिक्षा देऊन सुटका होते कसे, असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू