शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल बांधा! आता येणार घरपोच पत्र

By admin | Updated: July 17, 2015 03:54 IST

दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक लाभार्थीला घर मिळवून देण्यासाठी घरकुल बांधा, असे आवाहन आता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा थेट घरपोच पत्राद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना

पुणे : दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक लाभार्थीला घर मिळवून देण्यासाठी घरकुल बांधा, असे आवाहन आता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा थेट घरपोच पत्राद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना करणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी दिनेश डोके यांनी दिली.जिल्ह्यात ग्रामीण भागात ६ लाख २५ हजार ४२३ इतकी कुटुंबे असून, यात दारिद्र्यरेषेखालील १ लाख २२ हजार १३२ कुटुंबे आहेत. इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी ७६ हजार १४४ कुटुंबे प्रतीक्षा यादीत आहेत. २००६ -०७ पासून आजपर्यंत ५७ हजार ३८१ कुटुंबीयांनी घरकुल बांधले आहेत. यातील उरलेली १८ हजार ७७६ कुटुंब ही केवळ जागा नसल्याने घरकुलापासून वंचित आहेत, हे जिल्हा विकास यंत्रणेची आकडेवारी सांगते. २००६-०७ पासून आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणानुसार ही आकडेवारी समोर आली आहे. मात्र, कदाचित जागा नसलेल्या या कुटुंबीयांकडे आज घडीला जागा उपलब्ध असू शकते किंवा काहींकडे जागा उपलब्ध आहे; मात्र यंत्रणाच त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. तसेच ज्या वेळी त्यांना घरकुलासाठी विचारणा केली तेव्हाचे अनुदान कमी असल्याने त्यांनी प्रस्ताव दिला नाही...अशा अनेक शक्यता असू शकतात. या पार्श्वभूमीवर ग्रामीण विकास यंत्रणेने आता थेट त्या लाभार्थींशीच पत्राद्वारे संपर्क करण्याची नवी संकल्पना आखली आहे. १७ हजार ७९८ कुटुंबीयांना हे पत्र घरपोच पाठविण्यात येणार आहे. तसेच या पत्रावर एक टोल फ्री क्रमांक देणार असून, या योजनासंदर्भात काही अडचणी असतील, कुठे अडवणूक होत असेल, तर ती कळविण्याचीही विनंती करण्यात येणार आहे. या पत्रात घरकुल योजना काय आहे. यासाठी केंद्र व राज्य किती अनुदान देते, तसेच यासाठीची प्रक्रिया कशी असते, याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्या लाभार्थींचे नेमके काय प्रश्न आहेत, हे याच पत्राबरोबर जोडपत्र पाठविण्यात येणार असून, त्यांनी त्याद्वारे ग्रामीण विकास यंत्रणेला कळविण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)या उपक्रमामुुळे आणखी किती लाभार्थी आहेत, हे समोर आले, की आम्ही केंद्र शासनाला अनुदानापोटीची २० हजारांची रक्कम वाढवूनती ५० हजार करावी, अशी मागणी करून त्याचा पाठपुरावा करणार आहोत. - दिनेश डोकेजिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प अधिकारी