PMC: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ७ मार्च रोजी सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:03 AM2024-02-29T09:03:24+5:302024-02-29T09:04:48+5:30

यंदा महापालिकेचा अर्थसंकल्प दहा हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे...

budget of Pune Municipal Corporation will be presented on March 7 | PMC: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ७ मार्च रोजी सादर होणार

PMC: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ७ मार्च रोजी सादर होणार

पुणे :पुणे महापालिकेचा २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प ७ मार्च रोजी महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे स्थायी समितीला सादर करणार आहेत. गेल्या वर्षी ९ हजार ५९२ कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला होता. यंदा महापालिकेचा अर्थसंकल्प दहा हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार आयुक्तांनी १५ जानेवारी पर्यंत स्थायी समिती समोर अर्थसंकल्प मांडणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक असल्याने अर्थसंकल्प बाबत स्थायी समिती आणि मुख्य सभेत कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे या ठरावाला बगल देत मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडण्यावर आयुक्तांनी भर दिलेला आहे. त्यावरून आयुक्तांवर टीका होत आहे.

सलग तिसऱ्या वर्षातही ते मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडणार आहेत. येत्या ७ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीचा सादर केलेला आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजनासाठी किती निधी असणार याची उत्सुकता पुणेकरांना लागली आहे.

Web Title: budget of Pune Municipal Corporation will be presented on March 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.