शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

"चांगल्या सुविधा देणे लांबच..." पुरंदरच्या नीरेतील BSNL ची सेवा २४ तासांपेक्षा जास्त काळ ठप्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 18:13 IST

मोबाईलसह सर्व सेवा बंद झाल्याने सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांचे व्यवहार विस्कळीत

नीरा : रविवार पासून चोवीस तासांपेक्षा जास्त काळ नीरा (ता.पुरंदर) येथील भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल)ची इंटरनेट सह सर्व सेवा बंद  झाल्याने नीरा परिसरातील बँकाचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. बीएसएनएलची इंटरनेट सह सर्व सुविधा तातडीने सुरु करावी अशी मागणी नीरा व परिसरातील जनतेतून होत आहे. 

रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून बीएसएनएलच्या सर्व सुविधा बंद होत्या. एकीकडे केंद्र सरकार ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी नवनवीन योजना आणून अच्छे दिन आल्याचे दाखवित असून दुसरीकडे मात्र बीएसएनएलची इंटरनेट सह सर्व सेवा बंद पडताना दिसत आहे. नीरा आणि परिसरात काल पासून बीएसएनएलची सेवा ठप्प आहे. वास्तविक बीएसएनएलचे ग्राहक दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सुविधेचे बिल वेळेवर भरत असताना बीएसएनएल मात्र अखंडित सेवा देऊ शकत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करू लागले आहे. सासवडच्या ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर उमा नरगुंडे यांनी गेली दोन दिवस सेवा ठप्प असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खाजगी क्षेत्रातील विविध मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव नविन योजना आणत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बीएसएनएल कंपनीला ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे तर लांबच, पण आहे ती तरी सुविधा नीट देता येत नाही. शासनाच्या अशा कितेक सुविधा जनतेला देता येत नसल्याबद्दल नागरिकांनी केंद्र सरकारच्या सुविधाची खिल्ली उडविली. बीएसएनएलने तातडीने नीरा व परिसरातील दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सुविधा सुरु करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.  ''काल नीरा परिसराकडे जाणारी ऑप्टिकल फायबर केबल तुटली आहे.त्यामुळे सेवा बंद पडली आहे. ही सेवा सुरू करण्याचं काम सुरू आहे आर्धि अधिक सेवा सुरू करण्यात आली असून लवकरच पूर्ण सेवा सुरू होईल. - उमा नरगुंडे (ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर, सासवड दूरसंचार)''  

टॅग्स :PurandarपुरंदरBSNLबीएसएनएलelectricityवीजSocialसामाजिकMONEYपैसाMobileमोबाइल