शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

पुणे: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून; २४ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 2:09 PM

२४ तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या...

कामशेत : मावळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यावेळी कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे जलद गतीने हलवत २४ तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मंगळवार (दि.२) कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २) दुपारी ३:३० च्या सुमारास कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कामशेत पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवत २४ तासाच्या आत आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) याला मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपी तेजसने गुन्हा कबूल केला असून, त्याच्यावर पोस्को, ३६३, ३०२ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप करत आहेत.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी दुर्गा श्वानाचा वापर शोध मोहिमेत करण्यात आला.

या गुन्ह्याच्या शोधामध्ये पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, गणेश तावरे, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, समाधान नाईकनवरे प्राण येवले, समीर शेख, जितेंद्र दीक्षित, सागर बनसोडे, अनिल हिप्परकर, नितीन कळसाईत, आशिष झगडे, रवींद्र राऊळ, होमगार्ड प्रशांत कटके, किसन बोंबले आदींच्या पथकाने भाग घेतला होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkamshetकामशेतCrime Newsगुन्हेगारी