शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या घटनेने पुणे हादरले; मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 12:18 IST

19 वर्षे तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून

पुणे/किरण शिंदे : एका निर्घृण हत्याकांडाने पुणे शहर पुणे हादरले आहे. मित्र आणि मैत्रिणी सोबत तळजाई परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका 19 वर्षे तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल कसबे (वय 19) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत साहिल हा गुरुवारी सायंकाळी मित्र आणि मैत्रिणी सोबत तळजाई परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी एके ठिकाणी तो गेला असता तीन आरोपी त्या ठिकाणी आले. दुसऱ्याच्या मैत्रिणीसोबत फिरतोस काय असे म्हणून त्याला मारहाण करण्यात आले. तर एका आरोपीने चाकूने त्याच्या पोटावर आणि सर्वांगावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सोडून आरोपी पळून गेले. 

दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या साहिलला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीTaljai Tekdiतळजाई टेकडीPoliceपोलिस