शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गाडीला कट मारल्याच्या रागातून फोडला डोळा, हडपसर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 20:32 IST

जखमी वानखेडे हे उच्चशिक्षित असून त्यांनी डोळ्यासंबंधीचा कोर्स पूर्ण केला आहे. परंतु या किरकोळ वादातून त्यांचा एक डोळाच निकामी झाला आहे

पुणे :गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणाचा चाकूने डोळा काढलेल्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. यासाठी पोलिसांनी तब्बल  32 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा माग काढला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, 'हडपसर जवळील मुंढवा चौकात हॉटेल कल्ट नजीक रविवार (दि २ फेब्रुवारी) रोजी हे घटना घडली आहे.यावेळी रात्री दीड ते दोनच्या सुमारास आरोपी  योगेश चंद्रकांत हनमणे  (वय 24), रितेश अंबादास जाधव (वय 21) आणि अविनाश सुनील गायकवाड (वय 22) यांच्या चारचाकी गाडीसमोर जखमी अक्षय जाधव (वय २४) आणि सतीश वानखेडे यांची दुचाकी आली. त्यावेळी आरोपींनी यावेळी गाडीला कट का मारला? अशी विचारणा करीत,  रागातून वानखेडे यांच्या अंगावर आणि एका डोळ्यावर धारदार शास्त्राने वार केला.या  घटनेचे गांभीर्य लक्षात घेत 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी तपास केला. गाडीच्या बोनेटवर असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशावरून त्यांनी गाडीचा शोध घेतला. त्यानंतर आरटीओकडून माहिती घेऊन पुणे आणि मुंबई येथून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यातील जखमी वानखेडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी वानखेडे हे उच्चशिक्षित असून त्यांनी डोळ्यासंबंधीचा कोर्स पूर्ण केला आहे. परंतु या किरकोळ वादातून त्यांचा एक डोळाच निकामी झाला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि इतर कर्मचाऱ्यांनी तपास केला. 

टॅग्स :Hadapsarहडपसरhadapsar policeहडपसर पोलीसCrime Newsगुन्हेगारी