शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बीअारटी मार्ग की अपघात प्रवण क्षेत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 17:40 IST

बीअारटी मार्गामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पीएमपी बसचे 18 अपघात झाले असून त्यात 3 प्राणांतिक अपघात झाले अाहेत.

पुणे :  उपनगरातील प्रवाशांना जलद बससेवा मिळावी यासाठी बीअारटी बससेवा सुरु करण्यात अाली. शहरातील विविध मार्गांवर ही सेवा सुरु करण्यात अाली. सुरुवातीपासूनच यामध्ये अनेक त्रृटी असल्याचे समाेर अाले हाेते. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे त्या सुधारण्याचा फारसा प्रयत्न हाेत नसल्याचे चित्र अाहे. गेल्या वर्षभरात बीअारटी मार्गांमध्ये बीअारटी बसेसचे एकूण 18 अपघात झाले असून या अपघातांमध्ये 3 जणांना अापले प्राण गमवावे लागले अाहेत. 

     बीअारटी मार्गातील अडचणींची मालिका संपता संपत नसल्याचे चित्र अाहे. खासकरुन संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड वरील मार्गांमध्ये अनेक त्रृटी अद्याप राहिल्या अाहेत. बीअारटी मार्गातील सर्वात माेठी अडचण ही या मार्गांमध्ये हाेणारी खासगी वाहनांच्या घुसखाेरीची अाहे. दरराेज अनेक खासगी वाहने या बीअारटी मार्गांमध्ये घुसखाेरी करतात. ही वाहने तसेच बस वेगात असल्याने अनेक प्राणांतिक अपघात या मार्गात घडले अाहेत. ही घुसखाेरी राेखण्यासाठी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात अाली हाेती. परंतु त्यांचे सुद्धा वाहनचालक एैकत नसल्याचे चित्र अाहे. त्यानंतर पीएमपी कडून हे मार्ग सुरु हाेतात तेथे रस्सी लावण्याचा प्रयत्न केला. याने थाेडा फरक पडला असला तरी अनेक वाहनचालक दमदाटी करुन वाॅर्डनला ही रस्सी खाली घेण्यास भाग पाडतात. तसेच रात्रीच्या वेळी हा मार्ग माेकळाच असताे. त्यामुळे खासगी वाहने बेधडकपणे या मार्गातून जात असतात. संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गात काही भागातील वळणे ही अपघाताला निमंत्रण देणारी अाहेत. त्यात कुठलिही सुधारणा करण्यात अाली नाही. त्यामुळे  पीएमपी प्रशासन या मार्गांकडे गंभीरतेने पाहत नसल्याचे चित्र अाहे. 

    पीएपीकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात बीअारटी मार्गांमध्ये पीएमपी बसचे 18 अपघात झाले अाहेत. त्यात 3 लाेकांना अापला प्राण गमवावा लागला अाहे तर दाेन जण गंभीर जखमी झाले अाहेत. 13 किरकाेळ अपघात झाले अाहेत. पीएमपी बसेस व्यतिरिक्त खासगी वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातांची संख्याही अधिक अाहे. त्यामुळे हा बीअारटी मार्ग म्हणजे मृत्यूचा मार्ग ठरत अाहे. याबाबत बाेलताना पीएपपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, उपनगरातील नागरिकांना जलद बससेवा मिळावी यासाठी बीअारटी सुरु करण्यात अाली. परंतु बीअारटी मार्ग सुरु करताना ज्या प्राथमिक गाेष्टींची पुर्तता करणे अावश्यक अाहे त्या केल्या गेल्याच नाहीत. फक्त बीअारटी बसेससाठीच हा डिडीकेटेड काॅरिडाॅर असणे अावश्यक हाेते, परंतु तसे ते दिसत नाही. त्यामुळे जलद वाहतूकीचे जे पीएमपीचे उद्दीष्ट हाेते तेच फाेल ठरले अाहे. प्रशासनाकडून या मार्गांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याचा परिणाम या अपघातांमधून दिसून येत अाहे. या मार्गांमध्ये सुधारणा करण्याची प्रशासनाची इच्छा शक्ती नाही. यात सामन्य नागरिकांचा हाकनाक जीव जात अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPune BRTपुणे बीआरटीVishrantwadiविश्रांतवाडीPMPMLपीएमपीएमएल