शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीने यकृत दान केलेल्या भावाचा नऊ दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 17:11 IST

२ जुनला पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली होती

ठळक मुद्देघटनेला १८ तास उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही कुणालचा मृतदेह रुग्णालयाने त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलेला नाही

शेलपिंपळगाव: खेड तालुक्यात शेतकरी कुटुंबातील होमगार्ड पथकात कार्यरत असणाऱ्या बावीस वर्षीय तरुणाला कावीळ या आजाराने ग्रासले होते. मात्र काही दिवसातच आजाराने गंभीर रूप धारण केले. तरुणाला उपचारासाठी पिंपरी चिंचवडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित डॉक्टरांनी त्याची किडनी व यकृत खराब झाल्याचे सांगून तात्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी बहीण यकृत दान करण्यास तयार झाली. २ जूनला यशस्वी शस्त्रक्रियाही पार पडली. मात्र अखेर गुरुवारी रात्री भावाची प्राणज्योत मालवली. कुणाल दिलीप पावडे असे तरुणाचे नाव आहे.

दरम्यान कुणालच्या निधनाची बातमी संपूर्ण खेड तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली अन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. विशेष म्हणजे कुणालच्या बहिणीने स्वतःचे यकृत भावासाठी दान केले होते.

संबंधित डॉक्टरांनी किडनी व यकृत खराब झाल्याचे सांगून तात्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने १५ ते २० लाख रुपयांचा अपेक्षित खर्च सांगितला. वास्तविक कुणालच्या घरची आर्थिक परिस्थिती एकदम हलाकीची असल्याने हा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. मात्र गावातील तरुणांनी, मित्रांनी, गावकऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी कुणालच्या उपचारासाठी सोशल मीडियावर मदतीची साद घातली. त्यातून समाजातील असंख्य मदतीचे हात येऊन ९ ते १० लाख रुपयांची मदत गोळा करण्यात आली होती.

दरम्यान त्याच्या दोन बहिणींपैकी रेणुका महिंद्रा शिंदे हिने आपल्या भावाला यकृत दान केले होते. २ जुनला पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली होती. यकृत प्रत्यारोपणानंतर बहीण रेणुका सुखरूप आहे. मात्र कुणाल शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आला नव्हता.  अखेर गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेला १८ तास उलटूनही मृतदेह ताब्यात नाही 

गरीब कुटुंबातील कुणालचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री ९ वाजता रुबी हॉल रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेला १८ तास उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही कुणालचा मृतदेह रुग्णालयाने त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलेला नाही. 'अगोदर रुग्णालयाचे शिल्लक साडेचार लाख रुपयांचे बिल भरा, तरच मृतदेह ताब्यात देऊ अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याचे समजते. तर आजपर्यंत १२ लाख ५० हजार रुपये रुग्णालयात भरले असल्याचे कुणालच्या कुटूंबियांनी सांगितले. मृत्यूनंतरही कुणालची परवड सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडPoliceपोलिसDeathमृत्यूWomenमहिला