शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

बहिणीला ‘व्हिडिओ काॅल’ करून भावाने उचलले टोकाचे पाऊल; पत्नीसह दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:42 IST

- तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तरुणाच्या पत्नीसह दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...

पुणे : कौटुंबिक वादातून एकाने बहिणीला व्हिडिओ काॅल करून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पर्वती परिसरात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तरुणाच्या पत्नीसह दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन अशोक साळवे (४२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. 

याबाबत त्यांची बहीण पूनम उमेश कांबळे (४०, रा. कोकीळा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नितीन साळवे यांची पत्नी आरती नितीन साळवे (३८), तसेच त्यांच्या १८ आणि २० वर्षांच्या मुलींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन अशोक साळवे हे मुंबईतील महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते. पत्नी आणि दोन मुलींबरोबर ते पर्वती परिसरातील लक्ष्मीनगर येथे राहत होते. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचे. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास नितीन साळवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी बहीण पूनम कांबळे यांच्या मोबाईल नंबरवर ‘व्हिडिओ काॅल’ करून संपर्क साधला.

पत्नी आणि मुलींसोबत नेहमी होणाऱ्या वादामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांची बहीण पूनम कांबळे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कांबळे यांनी पत्नी आणि मुलींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Brother's suicide after video call; wife, daughters booked.

Web Summary : Pune: A man committed suicide after a video call to his sister, citing family disputes. His wife and two daughters are booked for abetment.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी