शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारातील नाश्ता, जेवणाचे दर घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 12:14 PM

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खाद्यपदार्थ झाले स्वस्त

ठळक मुद्देउमेदवारांनी खर्च करावयाच्या दहा मुख्य बाबींसाठीच्या खर्चाचे दरपत्रक जाहीर

प्रकाश गायकर- 

पिंपरी : विधानसभा निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांनी खर्च करावयाच्या दहा मुख्य बाबींसाठीच्या खर्चाचे दरपत्रक संनियंत्रण समितीने जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यांनंतर होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत जेवणासह नाश्त्याचे दर कमी केल्याने उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. निवडणुकीत उमेदवाराला प्रचारासाठी विविध बाबींवर खर्च करावा लागतो. त्यामध्ये  कार्यकर्त्यांच्या जेवाणावळीवर उमेदवाराला लाखो रुपये खर्च करावे लागतात. या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दरदिवशी सादर करावा लागतो. शहरातील विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करण्यासाठी उमेदवाराला अनेक प्रयत्न करावे लागतात. विविध ठिकाणी जाण्यासाठी वाहने, पेट्रोल यांचाही खर्च करावा लागतो. त्यासोबतच कार्यकर्त्यांच्या चहापाण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. निवडणूक कालावधीत यासोबतच मद्यावरही भरमसाठ खर्च करावा लागतो. या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत कडक नियम केले आहेत. शिवाय दरपत्रकही निश्चित करण्यात आले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना २८ लाख रुपयांची खर्च मर्यादा घालून देण्यात आली आहे. या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने खर्च सनियंत्रण समिती नेमली आहे. या समितीने मुख्य दहा बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार, शाकाहारी प्रकारात पुलाव ५० रुपये, व्हेज थाळी ६० रुपये, स्पेशल थाळी १२० रुपये असे दर निश्चित केले आहेत. यासोबतच मांसाहारी प्रकारात अंडाकरी ९०, मच्छी १५०, मटण २०० आणि चिकन थाळी १२० रुपये. साधा चहा ६ रुपये, स्पेशल चहा १२ रुपये, वडापाव १० रुपये, पोहे १५ रुपये, पॅटीस १० रुपये अशा पद्धतीने खर्च करता येणार आहे. याबरोबरच पाण्याची बाटली छोटी, मोठी आणि जार यासाठी प्रत्येकी १०, १५ आणि १०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे सर्व दर लोकसभा निवडणुकीतील दरपत्रकापेक्षा कमी आहेत........निवडणूक आयोगाचे मेनूकार्ड (रुपये)     मेनू    विधानसभा      लोकसभा         दर    दर    वडापाव    १०    १५    पॅटीस    १०    १५    व्हेज थाळी    ६०    १००    स्पेशल थाळी    १२०    १५०

नाश्ता ५ अन् जेवण ३० रुपयांनी स्वस्त४लोकसभा निवडणुकीवेळी वडापाव आणि पॅटीसचे दर १५ रुपये होते. पोहे, उपमा ३० रुपये, साधा चहा ८ व स्पेशल चहा १५ रुपये असे दर होते. तर जेवणामध्ये शाकाहारी थाळी १०० रुपये, स्पेशल थाळी १५० रुपये, अंडाकरी ९० रुपये, मटण, चिकन व मच्छी थाळी प्रत्येकी २५० रुपये याप्रमाणे होती. या दरांची तुलना करता नाश्ता ५ रुपये व जेवण ३० ते ६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यासोबतच प्रचार साहित्य, मंडप स्टेज, विद्युत उपकरणे यांचेही दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी स्वस्ताई झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत

टॅग्स :Puneपुणेvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकfoodअन्न