शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीच्या तयारीला आळंदीत ब्रेक; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा; प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 20:36 IST

कोरोनामुळे यंदा पायी पालखी सोहळा रद्द करून माऊलींच्या चलपादुका मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीच्या दिवशी पंढरीला जाणार आहेत...

ठळक मुद्देतत्पूर्वी शनिवारी (दि.१३) माऊलींच्या चल पादुकांचे साध्या पद्धतीने प्रस्थान होणार राज्य शासनाच्या सूचनेनुसार आळंदीतील माउलींचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद

भानुदास पऱ्हाड -

आळंदी : माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान येत्या शनिवारी ज्येष्ठ वद्य अष्टमीला (दि. १३) होणार आहे. अर्थातच अवघ्या दोन दिवसांवर प्रस्थान सोहळा येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून प्रस्थान सोहळ्याला अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे देवस्थानने लेखी पत्राद्वारे प्रशासनाकडे प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी मागितलेली असतानाही प्रशासनाने कुठल्याही सूचना देवस्थानला दिलेल्या नाहीत. परिणामी देवस्थानकडून केल्या जाणाऱ्या प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला ब्रेक लागला आहे.       कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. यापार्श्वभूमीवर यंदा संत ज्ञानेश्वर माउलींचा पायीवारी सोहळा रद्द करून माऊलींच्या चलपादुका मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीच्या दिवशी पंढरीला जाणार आहेत. दरम्यान राज्य शासनाच्या सूचनेनुसार आळंदीतील माउलींचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद असणार आहे.        तत्पूर्वी शनिवारी (दि.१३) माऊलींच्या चल पादुकांचे साध्या पद्धतीने प्रस्थान होणार आहे. त्यासाठी संबंधित पन्नास जणांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देवस्थानने प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. प्रशासनाने लवकरात - लवकर निर्णय घेऊन आदेश दिल्यास संबंधीत सोहळ्याची वेळेत तयारी पूर्ण होईल अशी अपेक्षा देवस्थांकडून व्यक्त होत आहे.

 माऊलींचा आषाढी पायीवारी सोहळा म्हटलं की, लाखोंच्या संख्येने तीर्थक्षेत्र आळंदीत वारकरी दाखल होत असतात. प्रस्थान सोहळ्याच्या दोन - तीन दिवस आगोदर शहरात जिकडेतिकडे वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. रात्रंदिवस टाळ - मृदुंगाचा निनादात कीर्तन, भजन, हरिपाठ ऐकू येतात. मात्र चालू वर्षी कोरोनाने वारकऱ्यांचा हा आनंद हिरावून घेतल्याने चित्र आहे.  ...............................

माऊलींच्या चलपादुकांचे विधिवत प्रस्थान होईल. मात्र हा सोहळा किती जणांच्या उपस्थितीत संपन्न करायचा; याबाबत प्रशासनाकडून देवस्थानला कळविले जाईल. सध्या मंदिर परिसर कंटेन्मेंट झोनलगत असल्याने सोहळ्यादरम्यान विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.       - संजय तेली, प्रांताधिकारी, खेड.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी