शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

पीएमपी खरेदीला आचारसंहितेमुळे  ब्रेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 1:50 PM

आचारसंहितेचा कालावधी दोन महिन्यांहून अधिक असल्याने खरेदी न झाल्यास पीएमपीच्या बससेवेवर परिणाम होऊ शकतो.

ठळक मुद्देया प्रक्रियेला आचारसंहितेतून वगळण्याची निवडणुक अधिकाऱ्यांकडे पीएमपी प्रशासनाची विनंती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी लागु झाली असून दि. २७ मेपर्यंत असणार पीएमपी बसला सातत्याने टायर, ऑईल, काचा यांसह विविध प्रकारच्या सुट्या भागांची आवश्यकता

पुणे : आचारसंहितेमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या विविध सुट्टे भाग खरेदी करण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा कालावधी दोन महिन्यांहून अधिक असल्याने खरेदी न झाल्यास पीएमपीच्या बससेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रक्रियेला आचारसंहितेतून वगळण्याची विनंती पीएमपी प्रशासनाने निवडणुक अधिकाऱ्यांकडे केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी लागु झाली असून दि. २७ मेपर्यंत असणार आहे. या कालावधीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. तसेच विविध विकासकामे, इतर कामांसाठी नवीन निविदा प्रक्रियाही राबविता येत नाही. पीएमपी बसला सातत्याने टायर, ऑईल, काचा यांसह विविध प्रकारच्या सुट्या भागांची आवश्यकता असते. त्यासाठी टप्याटप्याने निविदा प्रक्रिया राबवून खरेदी केली जाते. ही प्रक्रिया वर्षभर सुरू असते. आवश्यकतेनुसार साहित्य खरेदी केले जाते. मात्र, आता आचारसंहितेमुळे नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास बंधने आली आहेत. त्यामुळे प्रशासनाला निविदा काढता येत नाहीत. परिणामी, टायर, कुलंट, ऑईल व अन्य काही सुट्टया भागांची खरेदी थांबली आहे.याविषयी माहिती देताना सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर म्हणाले, आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया राबवायची की नाही याबाबत निवडणुक कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आचारसंहिता दोन महिने असल्याने या कालावधीत खरेदी न झाल्यास अडचणी येऊ शकतात. सध्या सुट्ट्या भागांची कोणतीही अडचण नाही. मुंबईतील बेस्ट प्रशासनानेही पीएमपी कडे खरेदी प्रक्रिया राबविण्याबाबत विचारणा केली आहे. ---------वेळेवर सुट्टे भाग मिळत नसल्याने पीएमपीच्या काही बस आगारातून बाहेर काढणे शक्य होत नाही. त्यातच आता आचारसंहितेच्या काळात खरेदी प्रक्रिया रखडल्यास बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बससेवा अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने सुट्टया भागांची खरेदी  प्रक्रिया आचारसंहितेतून वगळली जाईल. याबाबत निवडणुक कार्यालयाकडून पीएमपीला सवलत दिली जाईल. त्यामुळे बससेवेवर परिणाम होणार नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. --------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलElectionनिवडणूक