शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भावाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला कोयत्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 7:56 PM

भावाला शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून कोयत्याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. १७) सायंकाळी आठच्या सुमारास दुर्गानगर चिंचवड येथे घडली.

पिंपरी : भावाला शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून कोयत्याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. १७) सायंकाळी आठच्या सुमारास दुर्गानगर चिंचवड येथे घडली. अहमद सुलतान शेख (वय २४, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुभम बनसोडे (रा. चिखली), पवन लष्करे (रा. चिंचवड), अक्षय पासलकर (रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अहमद यांचा भाऊ सद्दाम याला विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी अहमद गेले. आरोपींनी त्यांना दुर्गानगर येथील सीएनजी पंपाच्या मागच्या बाजूला बोलवले. अहमद तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने मारहाण केली. यामध्ये अहमद यांच्या पाठीवर, हातावर, पायावर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस