The boy was beaten up for allegedly abducting his brother | भावाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला कोयत्याने मारहाण
भावाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला कोयत्याने मारहाण

पिंपरी : भावाला शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून कोयत्याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. १७) सायंकाळी आठच्या सुमारास दुर्गानगर चिंचवड येथे घडली.
 अहमद सुलतान शेख (वय २४, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुभम बनसोडे (रा. चिखली), पवन लष्करे (रा. चिंचवड), अक्षय पासलकर (रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अहमद यांचा भाऊ सद्दाम याला विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी अहमद गेले. आरोपींनी त्यांना दुर्गानगर येथील सीएनजी पंपाच्या मागच्या बाजूला बोलवले. अहमद तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने मारहाण केली. यामध्ये अहमद यांच्या पाठीवर, हातावर, पायावर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: The boy was beaten up for allegedly abducting his brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.