शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

बाऊल संगीत मनाेरंजनासाठी नव्हे : पार्वती बाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 18:28 IST

बंगालमधील प्रसिद्ध लोकगीत गायिका, संगीततज्ञ आणि मौखिक कथावाचक म्हणून संगीतविश्वात प्रचलित असलेले एक नाव म्हणजे पार्वती बाऊल . हातात एकतारा, खांद्यावर डुग्गी आणि पायात घुंगरू बांधून होणारे रंगमंचीय सादरीकरण हे त्यांच्या कलाविष्काराचे अनोखे वैशिष्ट्य. ’बाउल संगीत’ ही बंगालच्या संस्कृतीची ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेच्या पाईक असलेल्या पार्वती बाऊल यांच्याशी ’लोकमत’ ने साधलेला संवाद.

नम्रता फडणीस

* बाऊल संगीताची परंपरा काय आहे? या संगीताची वैशिष्टये कोणती?- बाऊल संगीत हे योगी संगीत आहे. ज्याला हजारो वर्षांची मौखिक परंपरा आहे. ही संगीत साधना गुरू शिष्य परंपरेतून आत्मसात करावी लागते. या संगीताचे शिक्षण घेण्यासाठी साधकाला दीक्षा घ्यावी लागते. ईश्वराचे नाव, योग आणि संगीतसाधना या नियमांबरोबर जीवन घालवावे लागते. ज्यांनी संगीताच्या खोलात जाऊन साधना केली त्यांच्याकडून  ध्यान आणि ज्ञानाच्या ग्रहणातून इतरांना चेतना मिळते. संगीतात नृत्य करताना एक भावोवस्था निर्माण होते आणि ईश्वरीय अनुभूती मिळते. शिव हे या  संगीताचे उगम स्थान आहे.

*  बाऊल संगीत आत्मसात करण्यासाठी कशाप्रकारची साधना केली जाते?-  या संगीतात जे गायन केले जाते ती केवळ सुंदर कविता नाही. त्यामध्ये खोलवर एक अध्यात्मिक चिंतन दडलेले आहे...या संगीतात भक्तीचा मार्ग दाखविला आहे. साधनेशिवाय त्यातील भाव निर्माण करू शकत नाही. म्हणून या संगीतात साधना महत्वाची मानली गेली आहे. संगीत साधनेसाठी अनेक गुरूकुल आणि घराणी आहेत. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केली जाते.

* एकाचवेळी गायन, वादन आणि नृत्य असा मिलाफ सादरीकरणामध्ये करणे तितकेसे सोपे नाही, तुम्ही हा समतोल सादरीकरणामध्ये कशापद्धतीने साधता?- एकाचवेळी हातात एकतारा, खांद्यावर डुग्गी आणि पायात घुंगरू बांधून नाचणे हे कौशल्य आहे असे लोकांना वाटते. पण यामागे देखील अनेक वर्षांची साधना आहे. ते शिकावे लागते. बाउल संगीत हातात नाही ते भावाच्या परिपूर्णतेमध्ये आहे.

* बाऊल संगीत आणि महाराष्ट्रीय संगीतामध्ये काही फरक आढळतो  का?- बाऊल संगीत आणि महाराष्ट्रीय संगीतामध्ये फक्त भाषेचा फरक आहे. ते सोडले तर दोन्ही संगीतपरंपरेमध्ये कमालीचे साम्य जाणवते. बाउल संगीतात ज्या वाद्यांचा वापर केला जातो तो थोडा वेगळा आहे. या संगीतात तुणतुणे, एकताराचा वापर केला जातो, आता गोपीयंत्राचा उपयोग केला जातो. अभिव्यक्ती वेगळी असली तरी भाव एकच आहे. संत तुकाराम, जनाबाई यांची पदावली आमच्या संगीताप्रमाणेच आहेत.

* आज तरूण पिढीसमोर पाश्चात्य, बॉलिवूड संगीताबरोबरच रिअँलिटी शोचेही आकर्षण आहे, या परिस्थितीमध्ये लोकसंगीताचे स्थान कुठे आहे असे वाटते?- सध्याचे संगीत हे फास्टफूडसारखे झाले आहे. अनेक मुले टँलेंटेड आहेत. पण ज्या संगीताविषयी आपण चर्चा करीत आहोत ती एक जीवनचर्या आहे. याचे स्थान हजारो वर्षांपासून अढळ आहे. या संगीतासाठी समर्पण वृत्ती आवश्यक आहे. प्रसिद्धधी किंवा ग्लँमरसाठी हे संगीत नाही. जे साधनेच्या मार्गावर जाऊ इच्छितात त्यांना ते सहजरित्या आत्मसात होऊ शकते. हे संगीत ध्यानधारणेवर आधारित आहे. इतर संगीताची जी आकर्षण आहेत ती मनोरंजन प्रकारात मोडतात मात्र बाउल संगीत मनोरंजन नाही.

* युवा पिढीचा कल बाउल संगीत शिकण्याकडे आहे का? तुमचं निरीक्षण काय?- ज्यांना साधना करण्याची इच्छा आहे अशी लहान  वयाची मुले-मुली आणि  तरूण पिढी बाऊल संगीताकडे वळत आहेत. या आशादायी  भविष्यात या संगीत परंपरेचे भवितव्य उज्वल आहे.

* विविध पातळीवरील लोकसंगीताचे डॉक्यूमेंटेशन होणे आवश्यक वाटते का?- कोणत्याही संगीताचे साधनेच्या माध्यमातून जतन होऊ शकते. तेच खरे तर उत्तम माध्यम आहे. समाजात अनेक परिवर्तन झाली, युद्ध झाली तरी संगीताची परंपरा टिकून राहिली. हे साधनामुळे  शक्य झाले. पण संवर्धनाअभावी कालपरत्वे काही गोष्टी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे नवी पिढीपर्यंत हा संगीत वारसा पोहोचण्यासाठी लिखित आणि ध्वनिमुद्रणाद्वारे त्याचे संवर्धन झाले पाहिजे. ज्यावेळी मी विद्यार्थी होते तेव्हा मला 140 वर्षांपूर्वी बाऊल संगीत कसे गायले जायचे, हे जाणून घेण्याची इच्छा होती.  पण ते लिखित स्वरूपात नसल्यामुळे  जाणून घेता आले नाही. स्वत:च्या भाषेत अभिव्यक्त होणे देखील आज दुर्मिळ झाले आहे. आपले संगीत आणि भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकmusicसंगीतwest bengalपश्चिम बंगाल