पुणे : म्हात्रे पुलाजवळील नदीपात्रात हात पाय बांधून पोत्यात घातलेल्या एका महिलेच्या खुनप्रकरणाचा गुंता गुन्हे शाखेच्या युनिट १ने उलघडला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे़.आबिद इम्रानखान (वय २२, रा़ कोंढवा) आणि मोहम्मद शहाबाद अब्दुल हमिद खान (वय २३, रा़. कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत़. तसेच मीरा वाघचौरे (वय ३२, रा़ दौंड) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़. तिच्या हातावर संजय असे गोंदलेले होते़ याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़. याप्रकरणी शहर व परिसरातील बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा तपास करण्यात येत होता़. त्याची माहिती मिळाल्यावर तिच्या मैत्रिणींना काही दिवसांपासून ती दिसली नव्हती़. त्यानंतर तिचा पती व मैत्रिणींनी शवागारात जाऊन पाहिल्यावर तिची ओळख पटली़ ही महिला वेश्या व्यवसाय करत होती़. आबिद आणि मोहमद यांनी २५ मे रोजी तिला बोलावून घेतले होते़ पैशाच्या कारणावरुन तिघांमध्ये भांडणे झाली़ लॉ कॉलेज रोडवर आरोपी वेल्डिंगचे काम करतो़ या वादातून त्यांनी गळा दाबून तिला मारले़ त्यानंतर तिचे हात पाय बांधून मृतदेह एका पोत्यात टाकला़. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास म्हात्रे पुलावर मृतदेह असलेले पोते नदीपात्रात टाकून दिले होते़. गुन्हे शाखेच्या युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांने या दोघांना अटक केली आहे़.
अनैतिक संबंधातून महिलेच्या खुनप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 15:24 IST
नदीपात्रात हात पाय बांधलेल्या अवस्थेत पोत्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यावर शहरात खळबळ उडाली होती.
अनैतिक संबंधातून महिलेच्या खुनप्रकरणी दोघांना अटक
ठळक मुद्देडेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल