शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बोपदेव घाटात फिरायला जाणे पडले महागात; ९५ हजारांचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 11:09 IST

एका टोळक्याने मोटारीमधील व्यक्तींना दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवून ऐवज लुटला.

पुणे : बोपदेव घाटात आपल्या मित्रांसमवेत फिरायला जाणे त्या सर्वांना चांगलेच महागात पडले. घाटात फिरायला गेल्यानंतर एका टोळक्याने मोटारीमधील व्यक्तींना दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवून सोन्याच्या अंगठ्या व सोनसाखळी असा ९५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संकेत मोहन मारणे, सूरज पांडुरंग जाधव (दोघेही वय २१, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या इतर सहा ते सात साथीदारांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोहमद कुरेशी (वय ४०, रा. कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व्यावसायिक असून ते त्यांच्या मित्र-मैत्रिणीसह बुधवारी सायंकाळी मोटारीमधून बोपदेव घाट सासवड परिसरात फिरायला गेले होते. रात्री परतत असताना बोपदेव घाटात लघुशंका आल्याने त्यांनी मोटार रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. दरम्यान, संकेत मारणेसह इतर आरोपी तेथे दाखल झाले. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली, तसेच मोटारीमधील त्यांच्या सहकारी महिलेस दगडाने  मारण्याचा धाक दाखवून तिच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि त्यांच्या मित्राच्या गळ्यातील सोनसाखळी असा ९५ हजारांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. तसेच आरोपींनी तेथून जाताना कारवर दगडफेक केली आणि मोटारीचे नुकसान केले. नागरिकांना लुटल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने संकेत व सूरज या दोघांना अटक केली आहे. त्यातील एक आरोपी एक इलेक्ट्रॉनिक कंपनीत नोकरी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील त्यांच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी