शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 18:43 IST

Bopdev Ghat Case in Marathi: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मोठं यश आलं. ७०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी या प्रकरणात वेगवेगळ्या पातळीवर तपास करत आहेत.  

Bopdev Ghat Case Updates: पुण्याजवळील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवलं. धमकावलं. त्यानंतर तरुणांचे शर्टाने हातपाय बांधले आणि तरुणीवर अत्याचार केले होते. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणेपोलिसांना पहिलं यश मिळालं आहे.    बोपदेव सामूहिक बलात्कार प्रकरण, पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं?

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, "सीसीटीव्ही पडताळणी आणि टेक्निकल डेटाचे विश्लेषण, स्थानिक पातळीवरून मिळालेली माहिती या सगळ्याचा आधार घेऊन हा गुन्हा उघड करण्यास यश मिळाले आहे. या कामासाठी पुणे शहर गुन्हे शाखा, ७०० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी वेगवेगळ्या स्तरावर काम करत होते. यामुळे आम्हाला काही सकारात्मक लीड मिळाली."

दोन आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना

"त्या आधारे आज पहाटे पहिले यश मिळाले आहे. एका आरोपीला अटक केली आहे. इतर दोन आरोपींना शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आमची पथके रवाना करण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर इतर आरोपी आम्हाला सापडतील", अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. 

सामूहिक बलात्कार प्रकरणात तीनच आरोपी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "जे दुर्गम भाग आहे, अशा ठिकाणी भविष्यात कुणावरही अशा प्रकारची घटना होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य उपाययोजना मग ते लाईट असेल, सीसीटीव्ही आणि इतर आवश्यक पाऊले उचलली जातील. या प्रकरणात तीन आरोपींची नावे एफआरआयमध्ये आहेत. आतापर्यंतच्या तपासातही तीनच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे."

आरोपींना शोधण्यात वेळ का लागतोय?

"त्या परिसरात सीसीटीव्हीचे प्रमाण कमी असल्याने आम्हाला वेळ लागला. त्याचबरोबर आरोपी प्रोफेशनल व्यक्तीसारखे वागत असल्याने ते सीसीटीव्ही असलेल्या मार्गावरून न जाता त्यांनी छोट्या रस्त्यांचा वापर केला. त्यामुळे आम्हाला सीसीटीव्ही पडताळणी जास्त बारकाईने आणि मोठ्या प्रमाणात करावी लागली", असे अमितेश कुमार यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे