शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

कोरोनाच्या संकटातही 'बळीराजाची सुपर कामगिरी' ; गतवर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या क्षेत्रात दहा पटीने भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 06:45 IST

कोरोना संकटाचे ढग संपूर्ण देशावर गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे...

ठळक मुद्देतुर, मूग, उडीद, बाजरी व सोयाबीनची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड 

सुषमा नेहरकर -शिंदेपुणे : संपूर्ण देशावर कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत असतानाच यंदा कृषी क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे. कोरोनामुळे सर्व क्षेत्रातील लोकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली असतानाच, एकट्या पुणे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या क्षेत्रात सरासरी तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत सरासरी 12 हजार 239 हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा यामध्ये मोठी वाढ होऊन तब्बल 2 लाख 30 हजार 468 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. 

संपूर्ण जुलै महिना पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील भाताची पुर्नलागवड लांबणीवर पडल्या असून, भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु जुन महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात प्रथमच बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. 

यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्र संकटा सापडले असले तरी कृषी क्षेत्राने शेतक-यांना चांगला आधार दिला आहे. त्यात यंदा जुन महिन्यांत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने आता पर्यंत सरासरीच्या 125 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गत वर्षी आता पर्यंत 12 हजार 239 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. जिल्ह्यात सुमारे 1लाख 84 हजार 274 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या होतात. यामध्ये जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यात खरीपाचे क्षेत्र अधिक आहे. तर दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर हे तालुके रब्बीचे तालुके म्हणून ओळखले जातात. परंतु जुन महिन्या चक्रीवादळात संपूर्ण जिल्ह्यातच चांगला पाऊस झाला. यामुळे यंदा अनेक वर्षांनंतर रब्बीच्या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बाजरी, तूर, मूग उडीद आणि सोयाबीनची लागवड झाली आहे. यामुळेच जिल्ह्याच्या खरीपाच्या लागवडी क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. ---- पावसाने ओढ दिल्याने भाताची पुनर्लागवड लांबणीवर पुणे जिल्ह्यात भाताचे सरासरी लागवड क्षेत्र 57 हजार 964 हेक्टर ऐवढे आहे . त्यापैकी आता पर्यंत केवळ 20 हजार 743 हेक्टर क्षेत्रावरच भाताची पुर्नलागवड झाली आहे. संपूर्ण जुलै महिन्या पावसाने ओढ दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस आणखी लांबल्यास भात उत्पादक शेतक-यासह सर्वच शेतकरी अडचणीत सापडतील.----जिल्ह्यात प्रमुख खरीप पिकांची लागवडची माहिती पिकाच नाव                सरासरी क्षेत्र          प्रत्यक्ष पेरणी       टक्केभात                            57964                    20743              36बाजरी                         38761                    52614               136तूर                              1920                       9011                469मूग                           13804                     14838              107उडीद                        1557                         2479                159 भुईमूग                    16090                       14886               93 सोयाबीन                17472                        19932                 114

टॅग्स :PuneपुणेCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीRainपाऊस