जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 11:59 IST2018-01-04T11:48:53+5:302018-01-04T11:59:09+5:30
गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय गौतमराव बिक्कड (वय २२, रा. कर्वेनगर, मूळ रा. प्रकाशनगर, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. ३१ डिसेंबरला जिग्नेश मेवाणी तसेच उमर खालीद यांची शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाली. या माध्यमातून २ समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवी पेशवाई संपुष्टात आणणे हीच भीमा कोरेगाव येथील शहिदांना श्रद्धांजली ठरेल, असे वक्तव्य खालीद तसेच मेवाणी यांना केले होते. यास प्रेरित होऊन काहींनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे.
पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अमृत मराठे करीत आहेत.