रस्त्यावरची लढाई ‘नवी पेशवाई’ संपवेल! - जिग्नेश मेवाणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:12 AM2018-01-01T06:12:40+5:302018-01-01T11:35:18+5:30

देशात जातीअंताची नवी क्रांती संसदेत घडणार नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरूनच होईल. ही लढाई नवी पेशवाई संपवेल. त्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचा, पक्षाचा, विचारधारेचा, गटा-तटाचा विचार न करता एकत्रित येवून लढा उभारला तर २०१९ मधील महासंग्रामात नरेंद्र मोदी यांना घरी बसवू, असा इशारा गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी येथे दिला.

 The battle on the road will end with 'Navi Peshwa'! - Jignesh Mevani | रस्त्यावरची लढाई ‘नवी पेशवाई’ संपवेल! - जिग्नेश मेवाणी  

रस्त्यावरची लढाई ‘नवी पेशवाई’ संपवेल! - जिग्नेश मेवाणी  

Next

पुणे : देशात जातीअंताची नवी क्रांती संसदेत घडणार नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरूनच होईल. ही लढाई नवी पेशवाई संपवेल. त्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचा, पक्षाचा, विचारधारेचा, गटा-तटाचा विचार न करता एकत्रित येवून लढा उभारला तर २०१९ मधील महासंग्रामात नरेंद्र मोदी यांना घरी बसवू, असा इशारा गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी येथे दिला.
भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्त शनिवारवाड्यावर आयोजित एल्गार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ‘आरएसएस’वर हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. ते म्हणाले, एल्गार परिषदेत सहभागी होऊ नये, अशी भीती काही संघटनांकडून घातली जात होती. पण, मी तुमच्या मोदी व शहांना घाबरलो नाही. तुम्ही तर अजून बच्चे आहात. ५६ इंची छाती फाडून येथे आलो आहे.

पंतप्रधान रामंदिरावर चर्चा करतील. पण जय शहा यांच्या ‘टेम्पल’ या कंपनीवर बोलणार नाहीत. वैचारिकदृष्ट्या कमजोर लोकांकडून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या जातात.
- उमर खालीद, जेएनयूमधील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता

राजकारण विसरून एकत्र या
दलित समाजातील नेत्यांनी पक्षीय राजकारण सोडून एकत्रित येत लढा उभारण्याची गरज आहे. स्मृती इराणींसह इतरांनी मिळून रोहितची हत्या केली.
मी घराबाहेर पडून ही लढाई सुरू
केली आहे. - राधिका वेमुला,
रोहित वेमुलाच्या आई

Web Title:  The battle on the road will end with 'Navi Peshwa'! - Jignesh Mevani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.